ललितने उजाळा दिला शाळेच्या आठवणींना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 15:04 IST2016-08-21T09:31:30+5:302016-08-21T15:04:50+5:30

शाळा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. स्वातंत्र्यदिन जवळ आलं की आठवण होते त्या शाळेच्या आठवणींची. या दिवशी प्रत्येकजण आपल्या शाळेच्या ...

Fine light illuminated school memories | ललितने उजाळा दिला शाळेच्या आठवणींना

ललितने उजाळा दिला शाळेच्या आठवणींना

ळा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. स्वातंत्र्यदिन जवळ आलं की आठवण होते त्या शाळेच्या आठवणींची. या दिवशी प्रत्येकजण आपल्या शाळेच्या आठवणीत रमलेला असतो. तर काहीजण स्वांतत्र्यदिन साजरा करण्यासाठी प्रत्यक्ष शाळाच घाटतात. अभिनेता ललिता प्रभाकर यानेदेखील स्वातंत्र्यदिनादिवशी थेट शाळेत पोहोचवून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. या आठवणींविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना ललित म्हणाला, शाळा सोडून बरेच वर्षे झाले आहे. माझे शाळेचे जे मित्र आहेत त्यातील सर्वजण विविध क्षेत्रात काम करत आहेत. प्रत्येकजण आपआपल्या आयुष्यात बिझी आहे. पण या धावत्या जीवनातून थोडा आराम मिळावा. या हेतूने आम्ही सर्व मित्रांनी १५ आॅगस्टला शाळेत भेटण्याचे ठरविले. कारण आमच्या शाळेत दरवर्षी मेडिकल कॅम्प आयोजित करतात. या उपक्रमाच्या निमित्ताने तरी आम्ही भेटलो.  इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर आम्ही सर्वानी खूप धमाल केली. शाळेतील काही शिक्षकांना भेटून देखील खूप मजा आली. शाळेतील आठवणींना उजाळा मिळावा. पण असावा असा एक दिवस ज्यावेळी माणूस स्वत:च्या बिझी शेडयूलमधून बाहेर येवून जुन्या आठवणीत रमतो. 

Web Title: Fine light illuminated school memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.