अखेर खरी श्रुती मराठे कोण हे लोकांना कळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 14:45 IST2017-03-02T09:15:00+5:302017-03-02T14:45:00+5:30

सोशल नेटवर्किंगला आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावाचा वापर करून अथवा त्यांचा फोटो वापरून त्यांची खोटे अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल ...

Finally, people who know the true Shruti Marathe will know | अखेर खरी श्रुती मराठे कोण हे लोकांना कळणार

अखेर खरी श्रुती मराठे कोण हे लोकांना कळणार

शल नेटवर्किंगला आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावाचा वापर करून अथवा त्यांचा फोटो वापरून त्यांची खोटे अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल नेटर्किंग साइटवर अनेकजण सर्रास सुरू करतात. या गोष्टीचा मनस्ताप कलाकारांना सहन करावा लागतो. अनेकवेळा या अकाऊंटच्या मार्फत त्यांच्या चाहत्यांशी चॅटिंग केली जाते. तसेच काहीवेळा तर या अकाऊंटवर कलाकारांचे अश्लिल फोटोदेखील पोस्ट केले जातात. लोकांना पाहाताना हे अकाऊंट त्या कलाकाराचेच आहे असे वाटत असल्याने आपले आवडते कलाकार असे फोटो का अपलोड करतात हा त्यांना प्रश्न पडतो. हे खोटे अकाऊंट आपल्याच मित्राचे अथवा मैत्रिणीचे आहे असे समजून इंडस्ट्रीतील लोकदेखील या अकाऊंटवरून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात.

shruti marathe facebook account

श्रुती मराठेने मराठी चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केले आहे. आज मराठी मालिका, चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपटात तिने तिच्या अभिनयाने तिची जागा बनवली आहे. श्रुतीचे अनेक फॅन्स आहेत. तिच्या नावाने तर फेसबुकला अनेक अकाऊंट आहेत. काही दिवसांपूर्वी तर तिच्या नावाने बनवण्यात आलेल्या एका अकाऊंटवर तिचे काही अश्लिल फोटोदेखील टाकण्यात आले होते. पण आता श्रुतीचे खरे अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आले आहे. त्यामुळे तिचे खरे अकाऊंट कोणते हे तिच्या फॅन्सना लगेचच कळणार आहे. अकाऊंट व्हेरिफाईड झाल्याचा श्रुतीला प्रचंड आनंद झाला आहे. तिने फेसबुकवर याबाबत लिहिले आहे की, अकाऊंट व्हेरिफाइड झाल्याबाबत फेसबुकचे आभार. आता खरी श्रुती कोण हे लोकांना कळणार आहे. 
श्रुतीला फेसबुकवर 59136 लोक फोलो करतात. तिच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी याबाबत तिचे अभिनंदनदेखील केले आहे. 


Web Title: Finally, people who know the true Shruti Marathe will know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.