'१ नंबरचा ढ'च्या चित्रीकरणाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 13:55 IST2019-03-06T13:55:20+5:302019-03-06T13:55:49+5:30
शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षण मुद्द्यांना स्पर्धा करणाऱ्या प्रबोधनात्मक आशय असलेल्या '१ नंबरचा ढ' या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे.

'१ नंबरचा ढ'च्या चित्रीकरणाला सुरूवात
किंग प्रोडक्शन आणि नर्मदास फ्युचर फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षण मुद्द्यांना स्पर्धा करणाऱ्या प्रबोधनात्मक आशय असलेल्या '१ नंबरचा ढ' या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी चित्रपटातील भूमिकांकरिता कलाकार ऑडिशन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या रितसर परवानगीने निर्मिती संस्थेकडून घेण्यात आली. या ऑडिशन करता विविध ठिकाणच्या कलाकारांनी गर्दी केली होती. सुमारे ४०० कलाकारांनी यात सहभाग नोंदवला आणि ही ऑडिशन उत्साहाने दिली. चित्रपट निर्मिती प्रक्रिया ही गतिमान झाली असून प्रत्यक्ष चित्रीकरण हे दिनांक १ मार्चपासून १७ मार्चपर्यंत जळगावमधील खिर्डी तसेच चांगदेव मंदिर तसेच गारबर्डी धरण आणि जंगलाचा परिसर येथे चित्रीकरण होणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते प्रशांत नागेश जाधव असून लेखक आणि दिग्दर्शक प्रशांत नर्मदा देविदास सोनवणे आहेत. चित्रपटाच्या टीममध्ये डी.ओ.पी. मिलिंद कोठावळे, कला दिग्दर्शक किरण कुमार अडकमोल आणि राहुल पाटील, प्रोडक्शन मॅनेजर सुरेश राजपुत व राम बोरस, तर सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा विक्रांत नंदू नलावडे हे सांभाळत असून त्यांच्याखेरीज टीममध्ये धनंजय धनगर, सोहेल शेख, पूनम जावरे, सपना बाविस्कर हे काम करीत आहेत.
तर प्रमुख कलावंत कमलेश सावंत, प्राची नील, विणा भुतकर, योगेश महाजन, विनोद खेडेकर, प्रविण डाळींबकर, प्रा.गणेश चंदशिवे त्याचबरोबर स्थानिक कलाकार असणार आहेत.