‘एक सत्य’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न,तर या कलाकारांच्या असणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 12:55 IST2018-03-28T07:25:03+5:302018-03-28T12:55:03+5:30
आपल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या ‘एक सत्य’ या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील ...
.jpg)
‘एक सत्य’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न,तर या कलाकारांच्या असणार भूमिका
आ ल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या ‘एक सत्य’ या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील एका गीताच्या चित्रीकरणाने संपन्न झाला.‘निर्झरा एन्टरटेंन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश गंगणे यांनी केले असून लेखन डॉ. दिनेश काळे यांचे आहे.मंदार चोळकर लिखित ‘जरा जरा अबोल तू’ या प्रणयगीताचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतल्या चित्रनगरीत पार पडले. डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर या तिघांवर हे गीत चित्रीत झाले आहे.भगवंत नार्वेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला वैशाली सामंत व ऋषिकेश रानडे यांचा स्वरसाज लाभला आहे. या चित्रपटाची कथा तसेच हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर, स्वप्नील राजशेखर यांच्यासह डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर आदि कलावंताच्या या चित्रपटात भूमिका आहेत.‘एक सत्य’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मंदार चोळकरने खूपच कमी वर्षात एक गीतकार म्हणून मराठी इंडस्ट्रीत आपले बस्तान बसवले आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांची आणि अनेक मालिकांची गीते लिहिली आहेत.याव्यतिरिक्त मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि तेजस रानडे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद गंध रुप ढंग घेऊन रसिकांना अविस्मरणीय काव्यानुभवाची सफर घडवत असतात.शब्द जुळले म्हणजे कविता येत नाही, आणि कविताला शब्दांनी बांधता देखील येत नाही. त्यासाठी लागतात काव्यात्मक विचार... ! आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणा-या कवितांना सुगंध तर येणारच! अशा या काव्यात्मक सुंगंधात रंगून जाण्याची नामी संधी या 'we -चार'च्या निमित्ताने श्रोत्यांना लाभत असते.