​लायन फेम सनी पवार' अ ब क या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 12:15 IST2017-07-05T06:45:28+5:302017-07-05T12:15:28+5:30

'लायन' या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळा बालकलाकार सनी पवार झळकला होता. ‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. सत्य ...

In the film, Lion Fem Sunny Pawar 'A B K' | ​लायन फेम सनी पवार' अ ब क या चित्रपटात

​लायन फेम सनी पवार' अ ब क या चित्रपटात

'
;लायन' या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळा बालकलाकार सनी पवार झळकला होता. ‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात सनीने ‘शेरू’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याने साकारलेली शेरूची भूमिका जगभरात गाजली होती आणि हा चित्रपट ऑस्करवारीत असल्याने सनीच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्याला काही महिन्यापूर्वी अभिनयासाठी 'द रायझिंग स्टार' हा पुरस्कार देऊन लंडनमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. त्यावेळी त्याचे विशेष कौतुक बराक ओबामा, सचिन तेंडूलकर अशा अनेक मान्यवरांनी केले होते. 
आगामी 'अ ब क' या मराठी चित्रपटातून सनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अ ब क या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत असून ‘हरी’ ही व्यक्तिरेखा साकारताना आपणाला तो दिसेल. सनी सध्या चौथीमध्ये शिकत आहे. ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट आणि गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर कुलकर्णी निर्मित असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमर शेडगे करत असून लेखन आबा गायकवाड यांचे आहे. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर यांनी लिहिली असून सरकार राज, रक्तचरित्र, भूत अशा अनेक चित्रपटांचे संगीतकार बापी- तुतल हे अ ब कला संगीत देत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कॅमेरामन महेश आणे चित्रपटाचे कॅमेरामन असून सनी पवारसह तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी असे अनेक दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात काम करणार आहेत. 
या चित्रपटाचे वैशिष्टय असे की हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायन करणार आहेत. अशी माहिती चित्रपटाचे निर्माते मिहीर कुलकर्णी आणि दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी दिली.

Web Title: In the film, Lion Fem Sunny Pawar 'A B K'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.