मानसिक रुग्णांवर भाष्य करणारा 'भय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:23 IST2016-01-16T01:12:06+5:302016-02-07T06:23:28+5:30
भीती ही प्रत्येकाच्याच मनात असते. कोणाच्या बाबतीत ती दिसते तर कोणी त्यावर विजय मिळवू शकतात. भीती या विषयावर आजवर ...

मानसिक रुग्णांवर भाष्य करणारा 'भय'
भ ती ही प्रत्येकाच्याच मनात असते. कोणाच्या बाबतीत ती दिसते तर कोणी त्यावर विजय मिळवू शकतात. भीती या विषयावर आजवर अनेक चित्रपट आणि नाटक बसवण्यात आली आहेत. त्यात प्रत्येकाने आपापल्या परीने भीती हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण भीती कोणत्याही प्रकारची असू शकते. कोणाला अभ्यासाची तर कोणाला भूताची. हाच विषय घेऊन येत आहेत दिग्दर्शक राहुल भाटनकर 'भय' हा चित्रपट.हा चित्रपट या चित्रपटांपेक्षा काहीसा वेगळा आहे, कारण हा इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट भीती तर पसरवेलच पण कथेची संहिता मानसिक रुग्णांवरदेखील प्रभाव टाकेल असा हा थ्रिलर चित्रपट असणार आहे. एका मानसिक रुग्णाला समाजातून बेदखल केलं जातं आणि माणसांमध्ये मिसळू दिले जात नाही. त्यामुळे त्याच्या मनावर या गोष्टीचा सखोल परिणाम होतो आणि त्याच्या कुटुंबावरही या गोष्टीचा वाईट परिणाम होऊ लागतो. पण या सर्व गोष्टींकडे वेळेत लक्ष दिले आणि व्यवस्थित काळजी घेतली गेली तर मानसिक रुग्ण बरा होऊ शकतो असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे शूटींग मुंबई आणि दुबई येथे करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा आणि संस्कृती बालगुडे आदी कलाकार आहेत.