/> मुलगी ही आईपेक्षा तिच्या बाबांच्या जास्त जवळची असते असे म्हणतात अन ते खरे देखील आहे. आई विषयी तर आपण नेहमीच भावना व्यक्त करतो, परंतू रात्रंदिवस आपल्या कुटूंबासाठी झटणाºया बाबांवर जास्त कधी बोललेच जात नाही. असेच वडिल अन मुलीचे भावनिक नाते उलगडणारा दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटामध्ये सध्या समाजात सुरु असलेल्या वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणे पाहता पाहता सर्वांच्या ओठी रेंगाळू लागले अन प्रेक्षकांनी या गाण्याला डोक्यावर घेतले. त्यानंत अल्बम आला अन आता हा चित्रपट. दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणे प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे संदिप खरे या चित्रपटात बाबांची भुमिका साकारीत आहेत तर मराठी इंटस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री संस्कृती बालगुडेने मुलीचा रोल अत्यंत प्रभावीपणे केला आहे. तसेच यामध्ये किशोर कदम,अस्ताद काळे, ज्योती चांदेकर, दिप्ती भागवत, प्रविण तरडे, किशोर चौघुले, भाग्यश्री देसाई या कलाकांच्या देखील भुमिका आहेत. येत्या २४ जुन रोजी आपल्याला दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट पाहता येईल.