लक्ष्मीकांत बेर्डेंच्या फॅमिलीचा फोटो पाहून चाहत्यांना आली अभिनेत्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:06 IST2022-03-04T18:05:30+5:302022-03-04T18:06:35+5:30

Laxmikant Berde:आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खळखळून हसवले.

Fans remembered the actor after seeing a photo of Laxmikant Berde's family | लक्ष्मीकांत बेर्डेंच्या फॅमिलीचा फोटो पाहून चाहत्यांना आली अभिनेत्याची आठवण

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या फॅमिलीचा फोटो पाहून चाहत्यांना आली अभिनेत्याची आठवण

आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी खळखळून हसवले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे झपाटलेला, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, अफलातून हे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. आजही ते प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पावलांवर पाउल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय (Abhinay Berde) आणि मुलगी स्वानंदी (Swanandi Berde) सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. दरम्यान स्वानंदीने सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. मात्र कमेंटमध्ये चाहते अभिनेत्याची आठवण काढताना दिसत आहेत. 

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि या माध्यमातून बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये फॅमिली असे लिहिले आहे. यात दोन फोटो असून त्यातील पहिल्या फोटोत प्रिया बेर्डे, अभिनय आणि ती पाहायला मिळतेय. या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकीकडे चाहते गोड आणि सुंदर फॅमिली म्हणत आहेत. तर काही चाहते हा फोटो पाहून लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढत आहेत. 


एका युजरने कमेंटमध्ये म्हटले की, आज आमचे आदरणीय लक्ष्मीकांत जी असते तर खूप छान वाटले असते. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, छान कुटुंब पण आपले लक्ष्या साहेबांची खूप कमी वाटते. यावरून लक्षात येते की लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नसले तरीही आज ते प्रत्येकाच्या मनात घर करून कायम आहेत.

Web Title: Fans remembered the actor after seeing a photo of Laxmikant Berde's family