अभिनय बेर्डेने करून दाखवलं! 'उत्तर' पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधल्या आईने दिली ५०० रुपयांची नोट, अभिनेत्याच्या कृतीचं कौतुक
By कोमल खांबे | Updated: January 2, 2026 11:44 IST2026-01-02T11:43:43+5:302026-01-02T11:44:09+5:30
'उत्तर' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान 'उत्तर' सिनेमातील कलाकारांनी थिएटरमध्ये उपस्थित राहत प्रेक्षकांना खास सरप्राइज दिलं. सिनेमा पाहून थक्क झालेल्या एका महिला प्रेक्षकाने अभिनय बेर्डेला बक्षीस म्हणून ५०० रुपयांची नोट दिली.

अभिनय बेर्डेने करून दाखवलं! 'उत्तर' पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधल्या आईने दिली ५०० रुपयांची नोट, अभिनेत्याच्या कृतीचं कौतुक
सध्या 'उत्तर' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. धुरंधरला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली टक्कर देताना दिसत आहे. 'उत्तर' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आई आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत असून 'उत्तर'चे शोदेखील हाऊसफूल होत आहेत. अशातच 'उत्तर' पाहायला आलेल्या एका प्रेक्षकाचा आणि अभिनय बेर्डेचा थिएटरमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.
'उत्तर' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान 'उत्तर' सिनेमातील कलाकारांनी थिएटरमध्ये उपस्थित राहत प्रेक्षकांना खास सरप्राइज दिलं. सिनेमा पाहून थक्क झालेल्या एका महिला प्रेक्षकाने अभिनय बेर्डेला बक्षीस म्हणून ५०० रुपयांची नोट दिली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दिसतंय की प्रेक्षक महिला अभिनयचं कौतुक करत आहे. त्यानंतर ती त्याच्या हातात ५०० रुपयांची नोट देते. ते पाहून अभिनयही थक्क होतो. प्रेक्षकांमधल्या त्या आईला अभिनय वाकून नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतो.
या प्रसंगाने भारावून गेलेला अभिनय म्हणतो, "वर्षाचा पहिला दिवस...आमची पहिली थिएटर भेट आणि प्रेक्षकांकडून मिळालेली ही पहिली पावती... प्रेक्षकांकडून मिळालेली पहिली कमाई... बस अजून काय हवं?". 'उत्तर' सिनेमात अभिनय बेर्डे, रेणुका शहाणे, हृता दुर्गुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर क्षितिज पटवर्धनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाने २.२५ कोटींची कमाई केली आहे.