Prajakta Mali : तुला बघितलं की मूड फ्रेश होतो राव..., प्राजक्ता माळीचे फोटो पाहून चाहते ‘सैराट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 11:37 IST2022-11-04T11:22:32+5:302022-11-04T11:37:23+5:30

Prajakta Mali : तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला.

fans goes crazy after seeing marathi actress Prajakta Mali photoshoot | Prajakta Mali : तुला बघितलं की मूड फ्रेश होतो राव..., प्राजक्ता माळीचे फोटो पाहून चाहते ‘सैराट’

Prajakta Mali : तुला बघितलं की मूड फ्रेश होतो राव..., प्राजक्ता माळीचे फोटो पाहून चाहते ‘सैराट’

प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) फोटो शेअर केले रे केली की, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स पडायला लागतात. सध्याही तेच. तरूणांची क्रश असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. प्राजूच्या फोटोंनी जणू चाहत्यांना वेड लावलं.
 प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत. कहो ना कहो... यह आँखें बोलती है..., असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं. प्राजक्ताचे हे फोटो सुंदर आहेतच. पण त्यापेक्षा सुंदर आहेत त्या प्राजक्ताच्या चाहत्यांच्या कमेंट्स.  तिचे हे फोटो आणि तिची पोस्ट वाचून चाहते तिच्यावर फिदा झालेत. 

‘आजच्या चित्राने मला वेड लावले प्राजु. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्रिय गोड हृदय... तुझे डोळे आहेत इतके सुंदर की मी तुझे डोळे बनून तुझ्या आयुष्याचा भाग बनू शकलो असतो,’ अशी कमेंट तिच्या एका चाहत्याने केली. ‘प्राजू तू माझा क्रश आणि माझे गोड हृदय... जेव्ही मी तुझे फोटो पाहतो तेव्हा मी तुझ्याबद्दल स्वप्न पाहतो प्राजू, तुझ्याबद्दल प्रेम करतो...,’असं एकाने लिहिलं.

प्राजू, तू आम्हा चाहत्यांना एक दिवस तुझ्या कातिल अदांनी मारणार आहेस बघ, नकटू..., अशी गोड कमेंट एका चाहत्याने केली आहे. ‘तुझ्या डोळ्याच्या काजळात माझा जीव जातो... डोळ्यात मरण्याची मजा माझ्या जगण्यात नाही,’ अशी भन्नाट कमेंट अन्य एकाने केली आहे. तुला बघितलं की मूड फ्रेश होतो राव..., अशी कमेंट करत एका चाहत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 प्राजक्ताच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर प्राजक्तानं नुकतीच लंडनहून नव्या सिनेमाचं शुटींग संपवून आली आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम होस्ट करत आहे.

Web Title: fans goes crazy after seeing marathi actress Prajakta Mali photoshoot