'आम्ही नाही जा...' म्हणत जब्याच्या शालूनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रिलला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:03 IST2025-05-30T13:03:01+5:302025-05-30T13:03:51+5:30

Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातच्या नव्या रिलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Fandry Fame Shalu Aka Rajeshwari Kharat shared reel on Aamhi Nahi Ja Song, Which get good response from audience | 'आम्ही नाही जा...' म्हणत जब्याच्या शालूनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रिलला मिळतेय पसंती

'आम्ही नाही जा...' म्हणत जब्याच्या शालूनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, रिलला मिळतेय पसंती

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फॅण्ड्री (Fandry Movie) सिनेमातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं सांगितलं. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र ट्रोलर्सकडे कानाडोळा करत ती रिल शेअर करताना दिसते. अलिकडेच ट्रेडिंग साँग एक नंबर, तुझी कंबर गाण्यावर रिल शेअर केला होता आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता तिने आणखी एक रिल शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. ज्यात ती आयडियाची कल्पना सिनेमातील आम्ही नाही जा या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. या गाण्यावरील तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. तिच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहते व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.


राजेश्वरी खरात हिला खरी ओळख २०१३ साली रिलीज झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटात राजेश्वरी खरात हिने शालूची भूमिका साकारली होती. ही एक शांत, साधी आणि उच्चवर्गीय मुलगी होती, जिच्यावर जब्याचे एकतर्फी प्रेम असते. यातील राजेश्वरीचं काम प्रेक्षकांना खूप भावलं. फँड्रीनंतर राजेश्वरी खरातने लघुपट, आणि सामाजिक माध्यम प्रकल्पांमध्ये काम केले. लवकरच ती जब्या म्हणजे सोमनाथ अवघडेसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक आणि कथानकाबद्दल समजू शकलेलं नाही. मात्र त्या दोघांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 

Web Title: Fandry Fame Shalu Aka Rajeshwari Kharat shared reel on Aamhi Nahi Ja Song, Which get good response from audience