सुहृदला घातला चाहत्यांनी गराडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:43 IST2016-12-24T13:43:35+5:302016-12-24T13:43:35+5:30
चित्रपटाला गर्दी होईल की नाही हे सांगता येत पण चित्रपटाच्या शुभारंभाला एवढी गर्दी....? निर्माते सदानंद (पप्पू) लाड, सहनिर्माते अंकुर ...

सुहृदला घातला चाहत्यांनी गराडा
च त्रपटाला गर्दी होईल की नाही हे सांगता येत पण चित्रपटाच्या शुभारंभाला एवढी गर्दी....? निर्माते सदानंद (पप्पू) लाड, सहनिर्माते अंकुर लाड यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या एल जी प्रॉडक्शन निर्मित नव्या चित्रपटाचा नेहमीप्रमाणे गिरगावातील 'लाडाच्या गणपती मंदिरात' शुभारंभ केला. मुहूर्ताचा प्रसंग टेलिव्हिजनच्या चॉकलेटी बॉय सुहृद वाडेकरवर चित्रित होणार होता. ही बातमी गिरगावात वाऱ्यासारखी पसरली आणि त्याला चाहत्यांनी गराडा घातला. त्याची 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला' ही हिट मालिका पहाणारे प्रेक्षक खास त्याला भेटायला गर्दी करून होते.
सध्या हिंदी तर नाहीच मराठी चित्रपटाचा शुभारंभ सुद्धा गर्दीतल्या ठिकाणी केला जात नाही .पण पप्पू लाड यांची श्रद्धा 'लाडाच्या गणपती'वर प्रचंड. त्यामुळे त्यांच्या नव्या 'देहांत' चित्रपटाचा शुभारंभ 'लाडाच्या गणपती मंदिरात'च करण्यात आला. यावेळी सध्या मालिकेत गाजत असलेला चॉकलेटी बॉय सुहृद, रश्मी राजपूत, अंकुर लाड आणि इतर सहकलाकार उपस्थित होते. मुहूर्ताला फार मोठी स्टारकास्ट नसल्याने निर्माते निश्चितं होते. पण मराठमोळ्या गिरगावात होणारा शुभारंभ आणि सुहृदच्या लोकप्रियतेने त्यांना सुखद धक्का दिला...चित्रपट रसिक शुभारंभालाच एव्हढे उचलून धरत आहेत ही 'लाडाच्या गणपती'ची कृपा.... अशीच कृपा शेवट्पर्यंत रहावी. एव्हढीच मागणी निर्माते पप्पू लाड यांनी गणपती पुढे केली. या चित्रपटात अशोक शिंदे, दीप्ती भागवत, सुप्रिया विनोद, सुहृद वाडेकर, रश्मी राजपूत, प्रफुल्ल जोशी, अंकुर लाड हे कलावंत प्रमुख भूमिकेत असून प्रदीप म्हापसेकर लिखित 'देहांत'चे दिग्दर्शन भगवान दास करीत आहेत. तर चित्रपटाला लहू-माधव यांनी संगीत दिले आहे.