'सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण...', प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:03 PM2023-06-28T16:03:27+5:302023-06-28T16:03:50+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

'Falling in gold-silver prices...', Prajakta Mali's post attracted attention | 'सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण...', प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टनं वेधलं लक्ष

'सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण...', प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टनं वेधलं लक्ष

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिची सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेत येत असते. दरम्यान तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये ती दागिन्याबद्दल बोलताना दिसते आहे. 

प्राजक्ता माळीने तिचे इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या नववारी साडीतले फोटो शेअर केले आहेत. या साडीत तिने साजेसा मेकअप आणि पारंपारिक दागिने घातलेले दिसत आहेत. तिच्या गेटअपवर कपाळावरील चंद्राची कोर शोभून दिसते आहे. तसेच तिने फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझदेखील दिल्या आहेत. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण. गुंतवणूकीसाठी उत्तम काळ. अशी बातमी बघितली; मग पटकन @prajaktarajsaaj च्या “तुळजा कलेक्शन (सोन्याचे अलंकार) मधील photos post करायला घेतले. मी पुढचं काही लिहीण्याची आवश्यकता नाही… हो ना? For more details- visit - www.prajaktaraj.in. फक्त पारंपरिक मराठी अलंकार मिळण्याचं एकमेव ठिकाण.(बाकी हे अलंकार आणि नऊवार नेसून; फोटोशूट वेळी मला एखाद्या राणीसारखं वाटत होतं. #भावना )


प्राजक्ताच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने म्हटलं तुला बघावं की दागिन्यांकडे हे कळत नाही. दुसऱ्या युजरने म्हटले की, विषय हार्ड ओ...अस्सल २४ कॅरेट. आणखी एका युजरने लिहिले की, सोळा शृंगारांनी नटलेली कुलीन मराठी स्त्री..अगदी शोभतात हे अलंकार तुझ्यावर..

वर्कफ्रंटबद्दल...

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर प्राजक्ता शेवटची लकडाउन चित्रपटात पाहायला मिळाली होती.

 

Web Title: 'Falling in gold-silver prices...', Prajakta Mali's post attracted attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.