Exclusive ​ स्वप्निल-गणेश आचार्य होणार...भिकारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 14:04 IST2016-12-07T14:04:27+5:302016-12-07T14:04:27+5:30

  priyanka londhe                   करोडो रुपयांमध्ये खेळणारे सेलिब्रिटीज आता भिकारी होणार हे ...

Exclusive Swapnil-Ganesh Acharya will be ... beggar? | Exclusive ​ स्वप्निल-गणेश आचार्य होणार...भिकारी?

Exclusive ​ स्वप्निल-गणेश आचार्य होणार...भिकारी?

 
m> priyanka londhe
         
        करोडो रुपयांमध्ये खेळणारे सेलिब्रिटीज आता भिकारी होणार हे ऐकुन तुम्हाला वाटले ना आश्चर्य. होय, पण असे होणार आहे, बॉलिवूडमधील आघाडीचा कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय असे बिरुद मिरवणारा स्वप्निल जोशी भिकारी होणार असे ऐकुनच धक्का बसला ना तुम्हाला. पण हे खरे आहे. अहो, रिअल लाईफमध्ये नाही तर आता हे दोघेही रिल लाईफमध्ये भिकारी होणार आहेत. स्वप्निल जोशी लवकरच गणेश आचार्य यांच्या भिकारी नावाच्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. गणेश आचार्य मराठीमध्ये भिकारी हा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत स्वप्निल दिसणार असल्याचे समजतेय. भिकारी या नावावरुनच हा चित्रपट एकदम हटके असणार हे समजतेय. परंतू स्वप्निल आपल्याला नक्की या सिनेमात भिकाºयाच्याच भूमिकेत दिसणार का हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. हा चित्रपट भव्य-दिव्य स्वरुपात होणार असल्याचे कळतेय. नुकताच सोशल  साईट्सवर स्वप्निल आणि गणेश आचार्य यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी आता हे दोघे एकत्र काम करणार अशी चर्चा रंगली होती. पण गणेश आचार्य स्वप्निलच्या चित्रपटात कोरिओग्राफी करणार असल्याचे बोलले जात होते. परंतू आता या गोष्टी वरुन पडदा उघडला असून गणेश आचार्य मराठी चित्रपट घेऊन असल्याचे समजतेय. या चित्रपटातील अभिनेत्री संदर्भात अजुन तरी काही खुलासा झालेला नाही. परंतू लवकरच या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईमध्ये होणार असून या मुहूर्ताला बिग बी अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि जॉन अब्राहम उपस्थिती लावणार असल्याचे समजतेय. आता हे कितपत खरे आहे हे तर आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: Exclusive Swapnil-Ganesh Acharya will be ... beggar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.