Exclusive:लवकरच दिग्दर्शक अभिनय देव रसिकांना देणार खुशखबर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 10:08 IST2016-11-14T18:00:30+5:302016-11-15T10:08:39+5:30
रुपेरी पडद्यावर 'गेम','देल्ली बेली' आणि 'फोर्स 2' यांसारखे हिट सिनेमा तर दुसरीकडे छोट्या पडद्यावर 24 सारखी सिरीज करत मालिकाविश्वातही ...
Exclusive:लवकरच दिग्दर्शक अभिनय देव रसिकांना देणार खुशखबर?
र पेरी पडद्यावर 'गेम','देल्ली बेली' आणि 'फोर्स 2' यांसारखे हिट सिनेमा तर दुसरीकडे छोट्या पडद्यावर 24 सारखी सिरीज करत मालिकाविश्वातही एक वेगळा ठसा उमटवला. रूपेरी पडदा असो किंवा छोटा छोटा पडदा एक से बढकर एक कलाकृती देऊन अभिनय देवने रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले. हिंदीत नशिब आजमवल्यानंतर आता अभिनय देव लवकरच मराठीतही सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. काही दिवसांपासून अभिनयवर मराठी रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अभिनयने मराठीतही आपले काम दाखवावे मात्र त्याचा कला फक्त हिंदीकडे असल्याचे बोलले गेले. आता लवकरच मराठी रसिकांची नाराजी अभिनय दूर करणार आहे. अभिनय एका मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करण्यासाठी सज्ज झालाय. दिग्दर्शक असो किंवा कलाकार एका चांगल्या कथानकाच्या प्रतिक्षेत असतो. हिंदी सिनेमाप्रमाणेच माझा मराठी सिनेमाही हटके असावा या आग्रहास्तव एका चांगल्या कथानकाच्या शोधात होतो. फायनली तो शोध संपला असून त्यावर काम सुरू केले असल्याचे दिग्दर्शक अभिनय देवने सांगितले. सिनेमाचे नाव आणि सिनेमात असणारी स्टारकास्ट अजून गुलदस्त्यात असून लवकरच खास चाहत्यांसाठी अधिकृत घोषणा करणार असल्याचेही अभिनयने म्हटले आहे. त्यामुळे नक्कीच अभिनयच्या चाहत्यांसाठी ही एक गोड बातमी असून त्यांची अभिनयवर असलेली नाराजीही दुर होईल हे मात्र नक्की.