Exclusive - सोनालीच्या फोटोशूटची हॅट-ट्रीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:15 IST2016-06-29T07:42:26+5:302016-06-29T13:15:46+5:30

बेनझीर जमादार   बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने फोटोग्राफर योगेश ...

Exclusive - Photoshoots Hat-Trick with Sonali Photos | Exclusive - सोनालीच्या फोटोशूटची हॅट-ट्रीक

Exclusive - सोनालीच्या फोटोशूटची हॅट-ट्रीक

ong>बेनझीर जमादार
 
बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने फोटोग्राफर योगेश गोलांडे याने केलेल्या फोटोशुटची हॅट-ट्रीक केली असल्याचे लोकमत सीएनएक्सला सांगितले. सोनाली म्हणाली, ज्याप्रमाणे मला बाईक रायडिंग, सायकलिंग करायला प्रचंड आवडते. त्याचप्रमाणे मला फोटोशुट करायला देखील फार आवडते. हे फोटोशुट मी गेली दोन वर्ष स्वत:ला मेन्टेंन केल्याबद्दल एक सेलिब्रेशन म्हणून केले आहे. यापूर्वी फोटोग्राफर योगेश गोलांडे याने दोन वेळा माझे फोटोशुट केलेले आहे. आतादेखील या सुंदर आउटफीटसमधील योगेशने क्लिक केलेल्या फोटोेसेशनची हॅट-ट्रीक झाली आहे. ते ही फक्त ३० मिनीटात पूर्ण केले आहे. योगेशच्या या कलेचे कौतुक करताना सोनाली म्हणाली,अशा फ्रेश व रायझिंग टॅलेन्टबरोबर काम करायला खूप आवडते. योगेशने काढलेल्या या फोटोशुटचे रिझल्टदेखील चांगले येत असल्याचे दिसत आहे. कारण सोशलमिडीयावर या फोटोशुटला प्रचंड लाइक्स मिळत आहे. 
 

Web Title: Exclusive - Photoshoots Hat-Trick with Sonali Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.