Exclusive : 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात झळकलेली सुखदा प्रेक्षकांना आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 21:44 IST2016-11-16T17:54:25+5:302016-11-16T21:44:52+5:30

   बेनझीर जमादार सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची चलती असल्याचे पाहायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक वेबसीरीज येत आहे. आता या ...

Exclusive: In the new role of 'Bajirao Mastani', who will be seen in the film? | Exclusive : 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात झळकलेली सुखदा प्रेक्षकांना आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार ?

Exclusive : 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात झळकलेली सुखदा प्रेक्षकांना आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार ?

   बेनझीर जमादार


सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची चलती असल्याचे पाहायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक वेबसीरीज येत आहे. आता या वेबसीरीजमध्ये आणखी एक वेबसीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेबसीरीजचे नाव अनसेन्सॉर्ड आहे. अभिनेत्री सुखदा खांडकेकर या वेबसीरीजचे सूत्रसंचालन करत आहे. सुखदाने आतापर्यत अनेक मालिका, नाटक, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट काम केले आहेत. पण ती तिच्या यशस्वी करिअरमध्ये पहिल्यांदा सूत्रसंचालन करत असल्याचे तिने लोकमत सीएनएक्सला सांगितले.

सुखदा म्हणते, ही वेबसीरीज खरेच प्रेक्षकांना खूपच आवडणारी आहे. कारण या वेबसीरीजमध्ये कोणत्याही कलाकाराच्या चित्रपटाच्या प्रमोशनविषयी चर्चा केली जात नाही. तर यामध्ये प्रत्येक कलाकार हा त्याच्या रिअल लाइफमध्ये कसा आहे हे जाणून घेतले जाते. त्याचबरोबर मला देखील लोकांच्या रिअल लाइफमध्ये जाणून घ्यायला फार आवडते. तसेच शोचे सूत्रसंचालन करताना फार अडचणी आल्या नाहीत त्याचे कारण माझा नवरा अभिजीत खांडकेकरने मला सूत्रसंचालनाच्या बेसिक गोष्टींचे मार्गदर्शन केले आहे. नुकताच या वेबसीरीजचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या एपिसोडमध्ये वैभव तत्ववादी प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या एपिसोडमुळे खरा वैभव काय आहे याची मला नव्याने ओळख झाली आहे. यापूर्वी सुखदा बाजीराव मस्तानी या चित्रपटात झळकली होती. तसेच तिने मालिका, नाटक यामधूनदेखील आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.

 

Web Title: Exclusive: In the new role of 'Bajirao Mastani', who will be seen in the film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.