Exclusive नेहा महाजन झळकणार गाँव या हिंदी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 12:01 IST2016-12-28T11:51:54+5:302016-12-28T12:01:48+5:30
बेनझीर जमादार प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री नेहा महाजन ही लवकरच हिंदी आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाचे ...

Exclusive नेहा महाजन झळकणार गाँव या हिंदी चित्रपटात
बेनझीर जमादार
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री नेहा महाजन ही लवकरच हिंदी आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव गाँव असे आहे. हा तिचा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शदाब कमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक गौतम सिंग हा असणार आहे. तिच्या या हिंदी चित्रपटाविषयी नेहा महानज लोकमत सीएनएक्सला सांगते, गाँव हा एक हिंदी आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात प्रेक्षकांना मी हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. माझी आवडती भूमिका मला करण्यास मिळाल्याने खूप आनंदित आहे. नुकताच या चित्रपटासाठी वर्कशॉप घेण्यात आला होता. यामध्ये मला अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या आहेत. तसेच या चित्रपटामध्ये माझ्यासोबत हिंदी चित्रपटातील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. या सगळयासोबत वर्कशॉप करताना खूप मजा आली. या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. या चित्रिकरणासाठी चाळीस दिवस मी जमशेदपूरमध्ये असणार आहे. माझ्यासाठी चित्रपट हा हिंदी असो या मराठी कथा चांगली असायला पाहिजे. त्याचबरोबर मला आवानात्मक काम करायला जास्त आवडते. मात्र मला आनंद या गोष्टीचा होतो की, माझी नवीन वर्षाची सुरूवात गाँव या चित्रपटाने होती. नेहाने यापूर्वी मराठी, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रेक्षकांची ही लाडकी मराठीमोळी अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीला कॉफी अॅण्ड बरचं काही, निळकंठ मास्तर, वन वे तिकीट असे अनेक चित्रपट दिले आहेत.
![]()