Exclusive: नागराज मंजुळेच्या आगामी मराठी सिनेमात झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 15:10 IST2017-06-17T08:24:56+5:302017-06-17T15:10:35+5:30
गेल्या काही दिवसांत नवाजुद्दीन 'अ ब क' नावाच्या मराठी सिनेमात काम करणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.या सिनेमात नवाजुद्दीनसोबत सुनील ...
.jpg)
Exclusive: नागराज मंजुळेच्या आगामी मराठी सिनेमात झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">गेल्या काही दिवसांत नवाजुद्दीन 'अ ब क' नावाच्या मराठी सिनेमात काम करणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.या सिनेमात नवाजुद्दीनसोबत सुनील शेट्टी आणि तमन्ना भाटियासुद्धा मराठीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र त्या अफवा असल्याचं खुद्द नवाजुद्दीन सिद्दीकीनं स्पष्टीकरण दिले आहे.सीएनएक्स लोकमतशी खास बातचित करताना त्यानं या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. मराठीत सिनेमा करण्याची त्याच्या मनातली इच्छाही यावेळी काही लपून राहिली नाही. 'सैराट'सारखाच मराठी सिनेमा करण्याची इच्छा असल्याचे नवाजुद्दीनने यावेळी सांगितले आहे. सैराट सिनेमा आपण पाहिला असून रसिकांप्रमाणेच आपल्यालाही या सिनेमानं अक्षरक्षः ‘याड’ लावलं असल्याचं त्यानं यावेळी म्हटलं. त्यामुळे असाच सिनेमा मिळाला तर मराठीत काम करेन असं नवाजुद्दीनने सांगितले. दिग्दर्शक नागराज मंजुळेने त्याचा एखादा सिनेमा ऑफर केला तर मी त्याला तात्काळ होकार देईल असं सांगायलाही नवाजुद्दीन यावेळी विसरला नाही. नागराज मंजुळेचे आपण फॅन असल्याचेही त्याने सांगितले आहे. सैराट या सिनेमासोबतच 'कोर्ट', 'किल्ला' हे मराठी सिनेमा पाहिल्याचेही नवाजुद्दीननं म्हटलं आहे. मात्र 'सैराट' सारख्या सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे नवाजुद्दीने सांगितले आहे.त्यामुळे सैराटसारखाच सिनेमा करण्याची त्याची मनातली इच्छा यावेळी काही लपून राहिली नाही. नवाजुद्दीनच्या या विधानामुळे त्याला मराठी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी मराठी रसिकांना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
नवाजुद्दीन मराठी सिनेमा करणार नसला तरी आगामी,मॉम, मुन्ना मायकल, मंटो,चंदा मामा दुर के यासारखे आणखी काही हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.
नवाजुद्दीन मराठी सिनेमा करणार नसला तरी आगामी,मॉम, मुन्ना मायकल, मंटो,चंदा मामा दुर के यासारखे आणखी काही हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.