Exclusive : गौरी नलावडे दिसणार 'या' नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 13:30 IST2016-11-17T14:57:30+5:302016-11-18T13:30:19+5:30

     बेनझीर जमादार   सध्या मराठी एकापाठोपाठ एक चांगली दर्जेदार नाटक येतायेत. एवढेच नाही तर या नवीन नाटकाच्या ...

Exclusive: Gauri Nalawade will appear in 'new role' | Exclusive : गौरी नलावडे दिसणार 'या' नव्या भूमिकेत

Exclusive : गौरी नलावडे दिसणार 'या' नव्या भूमिकेत

     बेनझीर जमादार

 
सध्या मराठी एकापाठोपाठ एक चांगली दर्जेदार नाटक येतायेत. एवढेच नाही तर या नवीन नाटकाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार रंगभूमीकडे वळले आहेत. सुरूची आडारकर, सुयश टिळक, प्राजक्ता माळी, सौरभ गोखले यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री गौरी नलावडेदेखील प्रेक्षकांना पहिल्यांदा रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. अ‍ॅप्सुलुट हे तिच्या नाटकाचे नाव असणार आहे. तिच्या या आगामी नाटकाविषयी गौरी लोकमत सीएनएक्सला सांगते, आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणशी ना कोणाशी खूप कनेक्ट आहोत असे वाक्य सातत्याने ऐकत असतो. मात्र हे जे कनेक्ट असणे म्हणजे नेमके काय असते हे या नाटकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्याचबरोबर या नाटकाच्या तालीमच्यावेळी खूप मजा आली. जर एखादया दिवशी तालीम नसेल मला खूप कंटाळा यायचा. पहिल्यांदा रंगभूमीवर येत असल्यामुळे मला आनंद होत आहे. पण कुठेतरी थोडी भितीदेखील वाटत आहे. पण असं म्हणतात की, रंगभूमीवर उभे असलो की, तुमच्या अंगात काहीतरी संचारत असते. एक कलाकार म्हणून तुम्ही दुप्पटीने एनर्जी लावून काम करता. त्यामुळे नेमकी ती काय जादू असते हे मला अनुभवायचं आहे. त्यामुळे मी हे नाटक करण्यासाठी प्रचंड उत्साही असल्याचे गौरीने यावेळी सांगितले. युंगधर देशपांडे यांनी हे नाटक लिहीले आहे. तर या नाटकाची दिग्दर्शनाची जबाबदारी मंदार देशपांडे यांनी सांभाळली आहे. या नाटकामध्ये गौरीसोबत सुशील इनामदार, रमा जोशी, अमोल  कुलकर्णी, सुनिल जोशी हे कलाकार झळकणार आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग २८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गौरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच ती कान्हा या चित्रपटातदेखील वैभव तत्ववादीसोबत झळकली होती. 

Web Title: Exclusive: Gauri Nalawade will appear in 'new role'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.