Exclusive आकाश झाला संस्कृतीचा फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 19:08 IST2016-07-13T13:38:33+5:302016-07-13T19:08:33+5:30
प्रियांका लोंढे सैराट मधील झिंगाट परशाने संपुर्ण देशालाच वेड लावले आहे ही ...
.jpg)
Exclusive आकाश झाला संस्कृतीचा फॅन
प्रियांका लोंढे
सैराट मधील झिंगाट परशाने संपुर्ण देशालाच वेड लावले आहे ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. पण लाखो तरुणींच्या दिल की धडकन असलेला आकाश ठोसर कोणाचा फॅन आहे हे तुम्हाला माहितीय का. तर ऐका आकाश चाहता आहे ऐका अशा मराठमोळ््या अभिनेत्रीचा जीच्या नृत्याचे दिवाने तर अनेकजण आहेत. तो तिच्या अॅक्टींगपेक्षा तिच्या डान्सचा दिवाना आहे अन तिच्या लटक्या-झटक्यांवर हा सैराट बॉय फिदा झाला आहे. तर ती अभिनेत्री आहे संस्कृती बालगुडे. अनेक चित्रपटांमधुन विविधांगी भुमिका साकारलेली संस्कृती आता आपल्याला महेश मांजरेकर यांच्या एफयु या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत हा झिंगाट पोरगा आकाश दिसणार आहे हे तर आपल्याला माहितीये. या दोघांनीही नूकताच झिंगाट या गाण्यावर डबस्मॅश देखील केला होता. याबद्दल सीएनएक्सला दिलेल्या खास मुलाखतीत संस्कृतीने सांगितले की, महेश मांजरेकर यांच्या सोबत मला काम करायचेच होते. एफयु हा चित्रपट कॉलेज गोईंग मुलीचा रोल मला करायला मिळतोय. ही टिपिकल कॉलेज तरुणीचा भुमिका नसुन यामध्ये तुम्हाला मी हटके अंदाजात पहायलसा मिळणार आहे. आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी यासारख्या माझ्याच वयाच्या कलाकारांसोबत मला या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळत असल्याने मी हॅपी आहे. अन आकाश बद्दल सांगायचे तर सैराटच्या प्रचंड यशानंतर देखील तो जमिनिवरच आहे. त्याच्यामध्ये बिलकुलच अॅटिट्युड दिसत नाही. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हाच त्याला सांगितले की मी तुझी फॅन आहे. पण तो मला म्हणाला नाही खरतर मीच तुझा फॅन आहे. तु खुप छान डान्स करतेस. हे ऐकुन मला खुपच छान वाटले. आता या नव्या फ्रेश जोडीची केम्स्ट्री आपल्याला लवकरच एफयु मध्ये पहायला मिळेल.