Exclusive डॉ. रखमाबाई राऊत मध्ये संतोष जुवेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 14:35 IST2016-07-19T09:05:38+5:302016-07-19T14:35:38+5:30

 प्रियांका लोंढे                             चित्रपटांमध्ये एकदमच रफटफ प्रकारच्या ...

Exclusive Dr. Santosh Juvekar in Ramamabai Raut | Exclusive डॉ. रखमाबाई राऊत मध्ये संतोष जुवेकर

Exclusive डॉ. रखमाबाई राऊत मध्ये संतोष जुवेकर


/> प्रियांका लोंढे
             
              चित्रपटांमध्ये एकदमच रफटफ प्रकारच्या भुमिका करणाºया संतोष जुवेकरला प्रेक्षकांनी झेंडा, मोरया, फक्त लढ म्हणा या सिनेमांमध्ये पाहिलेच होते. तर एक तारा सारख्या चित्रपटातील त्याच्या भुमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले. आता संतोष पुन्हा एकदा एका वेगळ््या चित्रपटामध्ये नव्या स्वरुपाच्या भुमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. संतोषने याबाबत लोकमत सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले की, मी  डॉ. रखमाबाई राऊत या चित्रपटामध्ये काम करीत आहे. एका वेगळ््या विषयावर काम करायला मिळाल्याने मला छान वाटतेय. या चित्रपटामध्ये माझ्या सोबत तनिषा चॅटर्जी, प्रसाद ओक, शरद पोंक्षे हे कलाकार आहेत या सर्व टिम सोबत काम करण्याचा अनुभव खुपच छान होता. १८३६ सालची ही पिरिआॅडिक फिल्म असल्याने तेव्हाचा काळ आम्हाला उभा करावा लागला आहे. चांगल्या प्रकारचा एक सिनेमा करण्याची संधी  मिळाल्याचे मला समाधान आहे. या चित्रपटाचे काही शुटिंग लंडनमध्ये करण्यात आले असुन काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या कथेविषयी जरी संतोषनेआाता काही खुलासा केला नसला तरी आपल्याला काही दिवसातच त्याच्या भुमिके विषयी माहिती मिळेल. पण आता या चित्रपटात हा अ‍ॅक्शन हिरो काय कमाल करतोय याच्या प्रतिक्षेत त्याचे चाहते नक्कीच असतील. 

Web Title: Exclusive Dr. Santosh Juvekar in Ramamabai Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.