"त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण..", प्रिया बापटने शेअर केली उमेश कामतसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:03 IST2025-12-08T16:02:22+5:302025-12-08T16:03:34+5:30
Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापटने नुकतेच तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत सोबतचे सुंदर फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.

"त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण..", प्रिया बापटने शेअर केली उमेश कामतसाठी खास पोस्ट
अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत विविध भूमिका केल्या आहेत. तिचे फॅन फॉलोव्हिंगपण खूप आहे. तसेच ती सोशल मीडियावर तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत अनेकदा शेअर करत असते. नुकतेच तिने पती आणि अभिनेता उमेश कामत सोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे, जी सध्या खूप व्हायरल होते आहे.
प्रिया बापटने सोशल मीडियावर उमेश कामतसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, "मी वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून बराच काळ झाला आहे. अलीकडे जीवनात थोडा बदल जाणवत आहे. सोशल मीडियावर गोष्टी शेअर करण्याची माझी इच्छा पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. पण आज मला ते व्यक्त करावेसे वाटले. कोणतेही विशेष कारण नाही... फक्त माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप कृतज्ञता आणि प्रेम आहे."
प्रियाने उमेशसोबतच्या नात्यातील आपले विचार स्पष्ट करताना सांगितले की, "त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण मला योग्य वाटतो. शांतता जी दिलासा देते, अर्थपूर्ण गप्पा आणि तो वेडेपणा जो खूप मजेदार असतो. असा जोडीदार असणे महत्त्वाचे आहे, ज्याची जीवनशैली तुमच्याशी जुळते. तुम्ही वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेत असाल, पण तरीही तुम्ही एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्सुक असता." प्रियाने हे फोटो गेल्या दोन वर्षांतील काही क्षण असे सांगून पोस्ट पूर्ण केली. तिची ही पोस्ट दोघांमधील घट्ट नाते आणि बॉन्डिंग दर्शवते.
वर्कफ्रंट
प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघे नुकतेच बिन लग्नाची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाले. या सिनेमात त्या दोघांव्यतिरिक्त गिरीश ओक आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत होते. तर अलिकडेच प्रिया बापट असंभव सिनेमात पाहायला मिळाली. या सिनेमात तिच्यासोबत मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे. तर उमेश कामत ताठ कणा सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला.