विदया बालनच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंग भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 12:46 IST2016-05-29T07:16:35+5:302016-05-29T12:46:35+5:30

यह फिल्म बनेगी, जरूर बनेगी...किसी बडे हिरो के बिना बनेगी...लेकिन गीता बाली के बिना... नहीं!एक अलबेला चित्रपटाच्या टीझरमध्ये हा ...

The event was filled with the presence of Bal Thackeray | विदया बालनच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंग भरले

विदया बालनच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंग भरले

फिल्म बनेगी, जरूर बनेगी...किसी बडे हिरो के बिना बनेगी...लेकिन गीता बाली के बिना... नहीं!एक अलबेला चित्रपटाच्या टीझरमध्ये हा डायलॉग आला आणि पडद्यावर विद्या बालनच्या रूपात कार्यक्रमत रंग भरले ... हा कार्यक्रम होता अलबेला चाटीझर लाँच सोहळयाचा. या सोहळ््यात विद्या बालनच्या हस्ते या चित्रपटाचे गाणे लाँच करण्यात आले आहे. मुंबईत रंगलेल्या या सोहळ्यात शोला जो भडके, दिल मेरा धडके म्हणत भगवान दादांच्या भूमिकेत असलेला मंगेश देसाई आणि गीता बालीच्या भूमिकेतील विद्या बालन यांनी सगळ्यांनाच या गाण्यावर नाचवले.  दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली. राजेंद्र किशन आणि मंदार चोळकर यांचे १९५१ च्या दशकातले शब्द आणि सी. रामचंद्र, संतोष मुळेकर या जादूगरांचे संगीत...हे गाणे पुन्हा कानावर पडले आणि त्याकाळच्या संगीताची जादू उपस्थितांवर झाली. लता मंगेशकर आणि सी. रामचंद्र यांच्या आवाजातील हे गाणे नव्या ढंगात अन्वेषा आणि विनय मांडके या गायकांनी गायले आहे. पुन्हा एकदा जुना काळ आपल्यासमोर रंगवणाºया हा एक अलबेला  चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य मंगलमूर्ती फिल्मस आणि किमया मोशन पिक्चर्स यांनी पेलले आहे. हा अलबेला प्रवास दाखवणाºया एक अलबेला सिनेमाची कथा आणि पटकथा शेखर सरतांडेल आणि अमोल शेटगे यांनी लिहिली असून शेखर सरतांडेल यांनी याचे दिग्दर्शिन केले आहे. बबन अडागळे यांनी सेट डिझाइन केले असून उदय देवरे यांनी आपल्या कॅमेरात तो काळ बंदिस्त केला आहे. मंगलमूर्ती फिल्मस प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित एक अलबेला येत्या २४ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.





Web Title: The event was filled with the presence of Bal Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.