स्वप्निल जोशी कामात कितीही व्यग्र असला तरी अशाप्रकारे देतो मुलांना वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 15:50 IST2018-05-08T10:20:25+5:302018-05-08T15:50:25+5:30
स्वप्निल जोशीने एक चॉकलेट हिरो म्हणून मराठी इंडस्ट्रीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयावर, दिसण्यावर त्याचे ...

स्वप्निल जोशी कामात कितीही व्यग्र असला तरी अशाप्रकारे देतो मुलांना वेळ
स वप्निल जोशीने एक चॉकलेट हिरो म्हणून मराठी इंडस्ट्रीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयावर, दिसण्यावर त्याचे चाहते फिदा आहेत. आता प्रेक्षकांचा हा लाडका हिरो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रणांगण या चित्रपटातील स्वप्निलची भूमिका, त्याचा लूक याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. याच चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
रणांगण या चित्रपटातील तुझा लूक खूपच वेगळा आहे. या लूकबाबत काय सांगशील?
मी पहिल्यांदा स्वतःला या लूकमध्ये पाहिले, त्यावेळी हा कोण असा प्रश्न मला पडला होता. मी स्वतःलाच एक खूप सरप्राईज दिले असेच मला वाटत होते. माझा हा लूक चित्रपटाच्या टीममधील सगळ्यांना खूप आवडला आणि त्यातही हा लूक छान जमून आला असल्याची पावती आम्हाला चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच मिळाली. या चित्रपटाद्वारे प्रणाली घोगरे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ती माझी खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे तिला मला भेटण्याची उत्सुकता होती. पण मी तिला सगळ्यांत पहिल्यांदा भेटलो, त्यावेळी याच लूकमध्ये होतो. मला पाहिल्यावर ती अक्षरशः घाबरली होती असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण ती जवळजवळ महिनाभर तरी माझ्याशी बोलली नव्हती. माझ्या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी हा लूक अगदी योग्य आहे. या चित्रपटात मी श्लोक नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. आपण सगळेच खलनायक आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस दडलेला आहे तसाच एक वाईट माणूस पण दडलाय, असे मानणारा हा श्लोक आहे. त्याच्या दिसण्यापासून त्याचे वागणे, बोलणे आणि देहबोली हे सगळेच वेगळे आहे.
चित्रपटाची कथा कशावर आधारित आहे?
राजकारणातील नाट्य पडद्यावर दाखवणारा हा फॅमिली ड्रामा आहे. खूप वर्षांत मराठी मध्ये अशाप्रकारचा चित्रपट आलेला नाही. ‘रणांगण’ हे युद्ध या विषयाकडे झुकणारे नाव असले तरी युद्ध म्हणजे फक्त हत्ती, घोडे, सैनिक, भाले, तलवारी असे नसते. आपण रोजच्या जगण्यासाठीही युद्ध लढत असतो. तसेच हे एक नातेसंबंधाचे रणांगण आहे. या युद्धात काय होते, कोण-कोण त्याला बळी पडतात आणि किती रक्तपात होतो, हे बघण्यात थ्रिल आहे.
या चित्रपटात तू सचिन पिळगांवकर यांच्यासोबत काम करत आहेस, त्यांच्यासोबत अनेक वर्षांनी काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
सचिन पिळगांवकर आणि माझे खऱ्या आयुष्यात खूपच चांगले नाते आहे. आम्ही चित्रपटात एकत्र काम करत नसलो तरी खाजगी आयुष्यात आम्ही अनेकवेळा भेटत होतो. पण गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला नव्हता. जवळजवळ १० वर्षांनी आम्ही एकत्र काम केले. त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळा कर्म्फट असतो. ते खूप चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही देखील तुमच्यातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देता. या चित्रपटातील आमच्या दोघांचा अभिनय खूपच चांगला झाला आहे. प्रेक्षकांना देखील आमचे काम नक्कीच आवडेल.
तू तुझ्या कामात नेहमीच व्यग्र असतोस, सध्या तर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तुला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागत आहे. या सगळ्यातून तुझ्या कुटुंबाला आणि विशेषतः मुलांना कसा वेळ देतोस?
खरे सांगू तर मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याने मला मुलांना तितकासा वेळ देता येत नाहीये. पण माझ्या मुलांसोबत जो काही वेळ मी घालवू शकतो याचे सगळे श्रेय माझ्या कुटुंबियांना आहे. माझे आई-वडील, लीना अनेक वेळा माझ्या मुलांना माझ्या चित्रीकरणाच्या स्थळी भेटायला आणतात. तसेच अनेकवेळा मी घरी येईपर्यंत मायरा आणि राघव जागे असतात. त्यामुळे मला त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो. तसेच टेक्नोलॉजीने केलेल्या प्रगतीमुळे व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून मला माझ्या मुलांच्या संपर्कात राहाता येते. मायराला तर आता मी चित्रपटात काम करतो हे देखील कळायला लागले आहे.
Also Read : स्वप्नील जोशीच्या मुलाच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?