सैराटच्या वादळानंतरही तीन दिवसात पंचेचाळीस लाखांचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:19 IST2016-05-24T09:49:09+5:302016-05-24T15:19:09+5:30
सैराट पाठोपाठ नुकताच रिलीज झालेला पैसा पैसा हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळविण्यात यशस्वी झाला आहे. प्रसिद्धीवर अफाट ...
.jpg)
सैराटच्या वादळानंतरही तीन दिवसात पंचेचाळीस लाखांचा गल्ला
स राट पाठोपाठ नुकताच रिलीज झालेला पैसा पैसा हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळविण्यात यशस्वी झाला आहे. प्रसिद्धीवर अफाट पैसा न खर्च करता एक अनोख्या कल्पकतेने प्रमोशन केल्याने पुन्हा एकदा केवळ टाईमपास नव्हे तर आशयघन चित्रपट पाहण्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अभिनेता सचित पाटील, स्पृहा जोशी आणि मिलिंद शिंदे यांचा दमदार अभिनय आणि कथेतील नाविन्य तसेच उत्तम सादरीकरण यामुळे पैसा पैसा चांगलाच गाजतोय. तीन दिवसात पैसा पैसा नेही पंचेचाळीस लाखांचा गल्ला जमवला आहे.सैराट च्या वादळात थिएटर आणि योग्य शोज न मिळून देखिल पैसा पैसा चित्रपटाचे यश खरच कौतुकास्पद आहे. उत्तम आशय आणि अभिनय आणि सादरीकरण असेल तर मराठी सिनेरसिक चित्रपटगृहात येतातच, याचे उत्तम उदाहरण पैसा पैसा या चित्रपटाने घालून दिले आहे. मित्राला कुणीतरी फक्त १० हजार रुपयांसाठी किडनॅप केलय आणि तेही परक्या शहरात...दोन तासात दहा हजार रुपये पोचले नाहीत तर मित्रा चा जीव घेण्याची धमकी...आणि ते जमवण्या साठी मित्राचीं होणारी तगमग..मित्र, नातेवाईक म्हणवून घेणाºयांचे टराटरा फाटणारे मुखवटे, पैसे मागीतल्या वर फोन स्विच आॅफ करणारी गर्लफ्रÞेंड, त्याच वेळी गरीब दुकानदारा चा दिलदारपणा ...अशा कितीतरी मनाला भिडणाºया गोष्टी या सिनेमातून जगाचं आणि जगण्याचं खरं रूप दाखवतात. सचित पाटील आणि विशेषत: आशीष नेवाळकर यांचा झोकून टाकणारा उत्कृष्ट अभिनय,मिलिंद शिंदे यांचा खलनायक आणि स्पृहा जोशीचीं कोसळणारा संसार संभाळण्याची धड़पड करणारी विवाहिता, हा या चित्रपटा चा यूएसपी म्हणावा लागेल.चित्रपटा चा शेवट हृदया ला भीड़णारा आणि मन हळवं करणारा आहे.मैत्री आणि पैसा पैसा जमावताना सर्व सामान्यांची होणारी धड़पड जाणीवपूर्वक सिनेमागृहात जाऊनच सहकूटुंब अनुभवायला हवी. असे निमार्ता शिव विलास चौरसिया यांनी सांगितले.