​सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग यांचे अशा या दोघी नाटक पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 14:52 IST2017-02-27T09:22:08+5:302017-02-27T14:52:08+5:30

जुनी नाटके नवीन कलाकारांसह पुन्हा रंगमंचावर आणण्याचा सध्या ट्रेंडच आपल्याला मराठी रंगभूमीवर पाहायला मिळत आहेत. सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचे ...

The duo will again meet the audience of the playground, Sulabh Deshpande, Reema Aparna and Lalan Sarang | ​सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग यांचे अशा या दोघी नाटक पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

​सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग यांचे अशा या दोघी नाटक पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

नी नाटके नवीन कलाकारांसह पुन्हा रंगमंचावर आणण्याचा सध्या ट्रेंडच आपल्याला मराठी रंगभूमीवर पाहायला मिळत आहेत. सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचे कार्ट चालू आहे यांसारखी जुनी नाटके नुकतीच नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत आणि या नाटकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेमदेखील मिळत आहे. आता सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग या दिग्गज अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असलेले अशा या दोघी हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली.
अशा या दोघी हे नाटक प्रचंड गाजले होते. पुरुषी अहंकारासमोर स्त्रीची होणारी कुचंबना या नाटकात मांडण्यात आली होती. या नाटकाचे लेखन गंगाराम गवाणकर यांनी केले होते. नुकतेच त्यांच्याच हस्ते या नाटकाचा मुहूर्त संपन्न करण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शन प्रशांत गिरकर करणार आहेत. प्रशांतने ईश्य या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच पुत्रकामेष्ठी, स्वामी समर्थ, रेशीमगाठी, समांतर यांसारख्या मराठी तर साहब बीबी और टीव्ही आणि गुब्बारे अशा हिंदी मालिकांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. 
अशा या दोघी या नाटकात सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे या भूमिका साकारण्यासाठी तितक्याच ताकदीच्या अभिनेत्रींची सध्या विचार केला जात आहे. या नाटकात कोणती अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार याचा अद्याप तरी काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा या दोघी या नाटकाची निर्मिती नमिता गिरकर यांच्या प्रचिती निर्मिती संस्थेअंतर्गत होणार आहे. 

Web Title: The duo will again meet the audience of the playground, Sulabh Deshpande, Reema Aparna and Lalan Sarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.