सैराटमुळे या चित्रपटगृहाला द्यावा लागला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 12:49 IST2017-01-12T12:49:05+5:302017-01-12T12:49:05+5:30

नांदेडच्या ट्रेझर मॉलने वसरणी येथे असलेल्या पीव्हीआर सिनेमाने ग्राहकांसोबत केलेल्या फसवणुकीबाबत एक लाख रुपये दंड आणि तक्रारीचा खर्च चार ...

Due to the sarats, the theater has to be given to the theater | सैराटमुळे या चित्रपटगृहाला द्यावा लागला दंड

सैराटमुळे या चित्रपटगृहाला द्यावा लागला दंड

ंदेडच्या ट्रेझर मॉलने वसरणी येथे असलेल्या पीव्हीआर सिनेमाने ग्राहकांसोबत केलेल्या फसवणुकीबाबत एक लाख रुपये दंड आणि तक्रारीचा खर्च चार हजार रुपये देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत. मंचच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्य आर.एच.बिलोलीकर यांनी हा निर्णय दिला.

नांदेडच्या ट्रेझर बाजार मॉलमध्ये पीव्हीआर सिनेमा आहे. प्रेक्षकांकडून जाणीवपूर्वक खोटारडेपणाने तिकीटाची अतिरिक्त रक्कम बारा लाख रुपये वसुल केल्याप्रकरणी संजय वसंतराव वानखेडे (रा.आसोली ता.माहूर ) यांनी नांदेड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली. सोबतच या प्रकरणात ग्राहकांची होणारी लुट स्पष्ट करताना पाण्याच्या बाटलीचे चाळीस, समोशाचे ५० रुपये आणि तिकीटाचे १५० असे पैसे संजय वानखेडे यांच्याकडून घेतले. 

संजय वानखेडे यांनी दि.१४ मे २०१६ रोजी सैराट पाहिला होता.  मराठी चित्रपटांना करमुक्ती मिळाली असल्यामुळे त्या तिकीटांचे दर ७० रुपयापेक्षा जास्त असू शकत नाहीत, अशा प्रकारे पीव्हीआर सिनेमाने ग्राहकांकडून जवळपास बारा लाख ३७ हजार ६६६ रुपयांची अतिरिक्त रक्कम उकळली. 

या बाबीची दखल घेत ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्य आर.एच. बिलोलीकर यांनी ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम उकळणाऱ्या पीव्हीआर सिनेमाने अर्जदार संजय वानखेडेला एक लाख रुपये दंड म्हणून द्यावेत आणि तक्रारीचा खर्च चार हजार रुपये द्यावा, असे आदेश जारी केले आहेत. या खटल्यात ऍड. विजय केंद्रे यांनी बाजू मांडली त्यांना ऍड.शंकरसिंह ठाकूर, ऍड.सुनंदा भोसले आणि ऍड.जयप्रकाश देवकत्ते यांनी सहकार्य केले.

Web Title: Due to the sarats, the theater has to be given to the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.