​या कारणामुळे तेजश्री प्रधान झाली खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:00 IST2018-01-16T06:30:46+5:302018-01-16T12:00:46+5:30

छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेने रसिकांच्या ...

Due to this reason, Tashashree Pradhan was pleased | ​या कारणामुळे तेजश्री प्रधान झाली खूश

​या कारणामुळे तेजश्री प्रधान झाली खूश

ट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेने रसिकांच्या मनावर जादू केली. या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला असला तरी तेजश्रीने साकारलेली जान्हवी आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तिचे सध्या काय सुरू आहे, कोणत्या मालिकेत, नाटकात किंवा सिनेमात ती काम करते याबाबत माहिती घेण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता असते. तेजश्रीचे लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. तेजश्री बबलू बॅचलर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेचे अनेक फोटो ती सध्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ती खूप खूश असल्याचे तिच्या फॅन्सना सांगितले आहे.
तेजश्री प्रधानने नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच खूश असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेकवेळा आपण आपल्या आयुष्यात प्रगती करत असल्याने खूप खूश असतो आणि ज्यावेळी आपण लीजेंडना भेटतो, तेव्हा काय बोलायचे हे आपल्याला कळत नाही. मी खूपच खूश आहे.
बबलू बॅचलर या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव भट्टाचार्य करत आहेत. या चित्रपटात तेजश्रीची जोडी शर्मन जोशीसोबत जमणार आहे. तेजश्रीने याआधी देखील शर्मन सोबत काम केले आहे. मैं और तुम या नाटकात या दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 
होणार सून मी या घरची ही मालिका संपल्यानंतर अभिनेता प्रशांत दामले यांच्यासह तेजश्री प्रधानने कार्टी काळजात घुसली या नाटकात काम केले. याशिवाय ती सध्या काय करते या मराठी सिनेमातही ती झळकली. सध्या ती सूर नवा, ध्यास नवा या मराठी रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे.

Also Read : तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांचा क्रेझीनेस तुम्ही पाहिला का?

Web Title: Due to this reason, Tashashree Pradhan was pleased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.