उर्मिला कोठारेच्या डोहाळ जेवणाचे फोटो तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 11:21 IST2017-10-24T05:51:05+5:302017-10-24T11:21:05+5:30
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांच्या घरात एक चिमुकला पाहुणा येणार आहे. उर्मिला गरोदर असून कोठारेंच्या कुटुंबात लवकरच एका ...

उर्मिला कोठारेच्या डोहाळ जेवणाचे फोटो तुम्ही पाहिले का?
आ िनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांच्या घरात एक चिमुकला पाहुणा येणार आहे. उर्मिला गरोदर असून कोठारेंच्या कुटुंबात लवकरच एका छोट्याशा बाळाचे आगमन होणार असल्याचे आदिनाथनेच मीडियाला सांगितले होते. उर्मिलाचे नुकतेच डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळ जेवणाचे फोटो उर्मिलानेच तिच्या सोशल नेटवर्किंग साईटला पोस्ट केले आहेत. डोहाळ जेवणाच्या वेळी उर्मिला आणि आदिनाथने एकाच रंगाचे कपडे घातले होते. उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोत आदिनाथ निळ्या रंगाच्या सदऱ्यात तर उर्मिला निळ्या रंगाच्या साडीत आपल्याला पाहायला मिळत आहे.
![urmila kothare baby shower]()
उर्मिलाच्या डोहाळ जेवणाला मराठी इंडस्ट्रीतील तिच्या मैत्रिणींनी देखील हजेरी लावली होती. तिच्या डोहाळ जेवणाला अभिनेत्री क्रांती रेडकर, कोरिओग्राफर फुलवा खामकर देखील उपस्थित होते.
उर्मिला आणि आदिनाथच्या आयुष्यात येणाऱ्या पाहुण्याची आदिनाथ आणि उर्मिला सध्या जय्यत तयारी करत असल्याचे आदिनाथने नुकतेच सांगितले. त्याने सीएनक्सशी बोलताना सांगितले होते की, आमच्या आयुष्यात एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. त्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. यंदाची दिवाळी तर आमच्यासाठी खूप स्पेशल होती. मालिकेची तयारी करण्यासोबतच नव्या पाहुण्याच्या आगमनाची आम्ही तयारी करत आहोत. मी कामात खूप व्यग्र असलो तरी मी जास्तीत जास्त वेळ उर्मिला सोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. तिला मी जितका वेळ देईल, तितका तो कमीच आहे असे मला वाटते.
![urmila kothare baby shower]()
उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.
![urmila kothare baby shower]()
Also Read : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात लवकरच येणार नवा पाहुणा