प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:45 PM2023-12-11T15:45:32+5:302023-12-11T15:46:59+5:30

Prajakta mali: या सिनेमातून प्राजक्ताला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. विशेष म्हणजे या सिनेमाला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

Do you remember Prajakta Mali and Bharat Jadhav marathi movie | प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का?

प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का?

सध्याच्या काळात प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहे. याच माध्यमातून ते थेट चाहत्यांशी जोडले जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसोबतच ही मंडळी त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडणारे लहानसहान किस्से, घटनाही शेअर करतात. काही वेळा हे सेलिब्रिटी त्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देतात. यात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सुद्धा तिच्या पहिल्या सिनेमाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यावेळी प्राजक्ताने तिच्या पहिल्या सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. प्राजक्ताने तिच्या पहिल्यावहिल्या सिनेमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडलाय की हा सिनेमा कोणता? कोणत्या सिनेमातून प्राजक्ता अभिनेत्री म्हणून सगळ्यांसमोर आली? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेता भरत जाधव दिसून येत आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या या सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत. इतकंच नाही तर या सिनेमात प्राजक्ता कमालीची वेगळी दिसत आहे. यात तिचे केसही छान लांबसडक असल्याचं दिसून येतं.

 'खो खो' या सिनेमाच्या माध्यमातून प्राजक्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. या सिनेमाला आता जवळपास १० वर्ष झाली आहेत. 10 years ago…When I had these long hair… काल आजोबा म्हणाले #YouTube वर पुर्ण film आलेय. (पूर्वी नव्हती.) It’s a good watch, असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान,  आजवर प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, पहिला प्रोजेक्ट हा सगळ्यांसाठीच खास असतो. त्यामुळे प्राजक्तासाठीदेखील हा सिनेमा खास आहे. या सिनेमात तिच्यासोबत भरत जाधव, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव, रेशम टिपणीस, उदय टिकेकर ही कलाकार मंडळी झळकली आहेत.

Web Title: Do you remember Prajakta Mali and Bharat Jadhav marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.