तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 06:00 IST2018-11-11T06:00:00+5:302018-11-11T06:00:00+5:30

सिम्बाच्या सेटवरून सिद्धार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचे सरप्राइज दिले.

Diwali became special for Tejaswini Pandit this year | तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास

तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास

ठळक मुद्देरणवीरने तेजस्विनीला भेटण्याची व्यक्त केली इच्छा


बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगवर लाखो तरूणी फिदा आहेत. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना होत असेल. पण जेव्हा रणवीर सिंगच भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा?.. ‘गुलाबीच कळी’ अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीर सिंगची चाहती आहे. तेजस्विनीचा मित्र अभिनेता सिद्धार्थ जाधवला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच सिम्बाच्या सेटवरून सिद्धार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचे सरप्राइज दिले. ह्या मेसेजमध्ये रणवीरने चक्क तिला भेटायची इच्छा व्यक्त केली.

ह्याविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “सध्या मी नि:शब्द झाली आहे. रणवीरची मी खूप काळापासून चाहती आहे. आणि ही गोष्ट सिद्धुला चांगलीच माहित होती. तो सध्या सिम्बाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे आणि अनपेक्षितपणे त्याने मला दिवाळीला खुद्द रणवीरचा माझ्यासाठीचा मेसेज रेकॉर्ड करून पाठवला.”

सिम्बाच्या सेटवरच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि रणवीरच्या मराठी सिनेसृष्टी आणि सिनेमाविषयीच्या अनेकदा गप्पा रंगतात आणि ह्या गप्पांच्या ओघात सिद्धार्थ जाधवने रणवीरला तेजस्विनी पंडितविषयी सांगितले. रणवीरने तेजस्विनीविषयी लगेच गुगलवर नाव टाकून माहिती काढल्यावर, त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिंधुताई सकपाळ चित्रपटाची नायिका तेजस्विनी होती, हे कळले. आणि मग त्याने लगेच सिद्धार्थकडून तेजस्विनीला व्हिडिओ पाठवून तेजस्विनीला भेटायची इच्छा व्यक्त केली.
रणवीरच्या ह्या ‘स्पेशल जेस्चर’ने अर्थातच तेजस्विनी पंडितची दिवाळी खास झाली आहे.  

Web Title: Diwali became special for Tejaswini Pandit this year