'तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा...', केदार शिंदे यांची पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:06 IST2024-01-05T11:47:51+5:302024-01-05T12:06:12+5:30

केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांचा आज वाढदिवस आहे.

director Kedar Shinde's special post on his wife Bela Shinde's birthday | 'तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा...', केदार शिंदे यांची पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट

'तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा...', केदार शिंदे यांची पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट

मराठीतल्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मेहनतीच्या जोरावर त्यांनी मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी मोहोर उमटवली आहे.  केदार शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. त्याचे कारण म्हणजे आज (५ जानेवरी) त्यांच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांचा आज  वाढदिवस आहे. केदार यांनी सोशल मीडियावर बेला यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहलं, हा फोटो exactly उलट हवा होता. कारण, तू पाठीशी खंबीरपणे ऊभी होतीस. म्हणून मी काहीतरी करू शकलो'.

पुढे त्यांनी लिहलं, 'तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा. चांगल्या वाईट दिवसात, मिळेल ते स्वीकारत गेलीस. माझ्या कला आयुष्यातले चढ उतार हे तू जास्तच भोगलेस. ५१ वर्षे होतायत पण, तू माझी मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई झालीस. खुप काही केलस, करतेयस, करशीलच याची खात्री आहे. वाढदिवस शुभेच्छा बेला, स्वामी कृपेने उत्तम होवो'.

केदार शिंदे यांच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मस्त लिहिले आहे', अशी कमेंट मराठी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये अभिनेते जयवंत वाडकर यांनी केली. तर एका चाहत्याने लिहलं, 'दादा वाहिनीसाठी अगदी उत्तम आणि वाहिनीला साजेसे लिहले आहे. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा'. तर आणखी एकाने म्हटलं, 'वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा मॅडम'.

केदार शिंदे आणि बेला शिंदे यांनी कला क्षेत्रात काम करणं असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग असो दोघांनी वेळोवेळी एकमेकांना साथ दिली आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास,  ‘लोकधारा’च्या निमित्ताने केदार आणि बेला यांची ओळख झाली होती.  मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं आणि केदार यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण बेला यांनी नकार दिला. मात्र, केदार यांनी हार पत्करली नाही. २ वर्षे त्यांनी बेला यांच्या होकाराची वाट पाहिली.  अखेर बेला यांनी केदार यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.  

Web Title: director Kedar Shinde's special post on his wife Bela Shinde's birthday