दिप्ती देवीचा पहिला लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 12:46 IST2016-08-31T07:16:34+5:302016-08-31T12:46:34+5:30

चार दिवस सासूचे या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री दिप्ती देवी हिचा कणिक हा पहिलाच लघुपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

Dipti Devi's first documentary | दिप्ती देवीचा पहिला लघुपट

दिप्ती देवीचा पहिला लघुपट

र दिवस सासूचे या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री दिप्ती देवी हिचा कणिक हा पहिलाच लघुपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा लघुपट अविनाश पिंगळे यांनी दिग्दर्शित केला आहे. रोजच्या खाण्यातील कणिक ही पौराणिक किवा शास्त्रातील अर्थ याचा समेत घडविणाºया भाष्यावर आधारित कणिक हा लघुपट असणार आहे. हा लघुपट १० ते १५ मिनिटांची असल्याचे अभिनेत्री दिप्ती देवी हिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. दिप्ती म्हणाली, मालिका व चित्रपट यांचा अनुभव माझ्याकडे होता. पण कणिक हा लघुपट मी पहिल्यांदाच करते. हा लघुपट करताना खरचं खूप छान अनुभव मिळाला.  कारण लघुपटामध्ये खूप कमी वेळात तुम्हाला तुमचा अभिनय दाखवावा लागतो. तसेच त्याचबरोबर कमी वेळात लघुपटाचा संदेश लोकांपर्यत पोहोचवायचा असतो. त्यामुळे आमच्यासाठी हे खूप चॅलेचिंग काम असतं. तसेच लघुपट हा कोणत्याही कॅटेगिरीत गणला जात नाही. त्यामुळे येथे आपले विचार मांडण्याची मोकळीता असते. त्यामुळे हा लघुपट माझ्यासाठी अविस्मरणीय राहीन. या लघुपटाचे एडिंटीगचे काम चालू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

Web Title: Dipti Devi's first documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.