​'अष्टवक्र' सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 12:45 IST2018-05-18T07:15:01+5:302018-05-18T12:45:01+5:30

'अष्टवक्र' या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद अशी सर्वव्यापी जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी सांभाळली आहे. त्यांनी सिनेमाच्या बांधणी करता तब्बल तीन वर्षांचे अथक परिश्रम घेतले आहेत.

Did you watch 'Ashtavakra' movie trailer? | ​'अष्टवक्र' सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

​'अष्टवक्र' सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

्टवक्र म्हणजे काय? आजच्या परिस्थितीशी त्याचा नेमका संबंध कसा? या सारख्या अनेक प्रश्नांची उकल करणाऱ्या 'अष्टवक्र' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल साईट्सवर लाँच करण्यात आला. वरुणराज प्रॉडक्शन निर्मित 'अष्टवक्र' सिनेमा येत्या ८ जून २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मूळ प्रवाहापासून विभक्त असलेल्या समाजाचे नेमके मूळ या सिनेमात मांडले आहे. माणसाच्या जडणघडणीत कुटुंब आणि समाज महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. मात्र आजही समाजात विकृत, मानसिक संतुलन घालवलेली माणसं जगत आहेत, ज्यांना अपराधी किंवा गुन्हेगार असं थोडक्यात बोलून सगळेच मोकळे होतात. पण जन्मतः अशी माणसं अपराधी म्हणून जन्माला येतात का, त्यांना या गुन्हेगारी जगात कोण आणतं? हे संस्कार कुठे होतात या सारख्या बऱ्याच गोष्टींची उकल 'अष्टवक्र' सिनेमात होणार आहे. या चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या ट्रेलरमध्ये पहिल्यांदाच महिला कैदींच्या आयुष्याचा उलगडा केला गेला आहे. 
एका वेगळ्याच विश्वावर आणि कधीही न हाताळलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर या सिनेमाच्या माध्यमातून दृष्टिक्षेप टाकला आहे, याची कल्पना या ट्रेलरच्या माध्यमातून येते. 'अष्टवक्र' या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद अशी सर्वव्यापी जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी सांभाळली आहे. त्यांनी सिनेमाच्या बांधणी करता तब्बल तीन वर्षांचे अथक परिश्रम घेतले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सिनेमाचा नेमका विषय मांडत या सिनेमाचे चित्रीकरण केले गेले आहे. गरोदर असताना अटक झालेल्या महिला कैदीची आणि तिथेच जन्माला येणाऱ्या मुलाची ही कहाणी आहे. काळजाला चटका लावून जाणाऱ्या या सिनेमाचे निर्माते वरुणराज साळुंके आहेत. सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे 'अष्टवक्र' सिनेमा एक वेगळीच उंची गाठताना दिसतो. अभिनेता विद्याधर जोशी यांच्यासोबत अभिनेत्री मयुरी मंडलिक, मंगेश गिरी, वीणा अरुण, हर्षदा बामणे, प्रीती तोरणे-कोळी या नवोदित कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर सिनेमाचे छायांकन विमल मिश्रा, संकलन सुबोध नारकर, गीत मयुरी मंडलिक, संगीत चंद्रोदय घोष, गायक साकार आपटे आणि गायिका रुपाली मोघे यांचा सिनेमात सक्रिय सहभाग आहे. वेगळ्या धाटणीचा विषय असलेल्या अष्टवक्र सिनेमाच्या ट्रेलरमुळे सिनेमाची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. 



Also Read : विद्याधर जोशी यांची मुख्य भूमिका असलेला अष्टवक्र ८ जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Web Title: Did you watch 'Ashtavakra' movie trailer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.