दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अमृता खानविलकरची सखी बहीण, पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 18:14 IST2022-02-16T15:03:39+5:302022-02-16T18:14:12+5:30
सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात.

दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अमृता खानविलकरची सखी बहीण, पाहा तिचे फोटो
सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)च्या बहिणीविषयी सांगणार आहोत..
फार कमी लोकांना अमृताच्या बहिणीबद्दल माहित नाही. अमृताला सख्खी बहिण असून तिचे लग्न झाले आहे. तिची बहिण लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या बहिणीचे नाव अदिती खानविलकर बक्षी आहे. तिने दीपक बक्षीसोबत लग्न केले आहे. ती एअर हॉस्टेस असून ती दुबईत राहते. अदितीला दोन मुले आहेत निर्वाण आणि नुरवी. अदितीदेखील अमृता इतकीच दिसायला सुंदर आहे.
अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तशीच ती सोशल मीडियावर फॅमिली सोबतचे फोटो शेअर करत असते.
अमृता मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृताने राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा या हिंदी चित्रपटात काम केले आहे. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय तिने ‘खतरों के खिलाडी, डान्स इंडिया डान्स, सूर नवा ध्यास नवा’ अशा अनेक रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. शेवटची ती 'वेल डन बेबी' चित्रपटात पहायला मिळाली.