स्वप्निल जोशी आणि त्याची मुलगी मायराचा हा क्यूट फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:26 IST2019-03-18T16:22:58+5:302019-03-18T16:26:01+5:30

स्वप्निलने मायरासोबतचा एक क्यूट फोटो नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

did you see swapnil joshi picture with his daughter maayra? | स्वप्निल जोशी आणि त्याची मुलगी मायराचा हा क्यूट फोटो तुम्ही पाहिला का?

स्वप्निल जोशी आणि त्याची मुलगी मायराचा हा क्यूट फोटो तुम्ही पाहिला का?

ठळक मुद्देस्वप्निलने शेअर केलेल्या या फोटोत स्वप्निल झोपला असून त्याच्या बाजूला शांतपणे बसून मायरा दूध पिताना दिसत आहे. स्वप्निलने मायरा आणि बाबाचा रविवार अशी कॅप्शन त्याने त्या फोटोसोबत दिली आहे.

स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्निल कितीही कामात व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देतो. त्याला मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत. तो नेहमीच वेळात वेळ काढून आपल्या मुलांसोबत खेळतो, मस्ती करतो. स्वप्निलने मायरासोबतचा एक क्यूट फोटो नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

स्वप्निलने शेअर केलेल्या या फोटोत स्वप्निल झोपला असून त्याच्या बाजूला शांतपणे बसून मायरा दूध पिताना दिसत आहे. स्वप्निलने मायरा आणि बाबाचा रविवार अशी कॅप्शन त्याने त्या फोटोसोबत दिली आहे. या फोटोला केवळ एका दिवसांत ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून हा फोटो खूपच क्यूट असून बाप-मुलगी दोघेही या फोटोत खूपच छान दिसत असल्याचे स्वप्निलच्या फॅन्सने प्रतिक्रियांद्वारे म्हटले आहे. 

स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे त्याने ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. त्याचा मोगरा फुलला हा चित्रपट जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबतच साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: did you see swapnil joshi picture with his daughter maayra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.