"आदित्य धरला कडक सॅल्यूट...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- "भारताविरुद्ध जे काम करतील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:45 IST2026-03-27T12:44:28+5:302026-03-27T12:45:00+5:30

मराठी गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी 'धुरंधर २' पाहून थक्क झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

dhurandhar 2 saleel kulkarni gets emotional after watching movie appreactiates aditya dhar | "आदित्य धरला कडक सॅल्यूट...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- "भारताविरुद्ध जे काम करतील..."

"आदित्य धरला कडक सॅल्यूट...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- "भारताविरुद्ध जे काम करतील..."

Dhurandhar 2: आदित्य धरच्या 'धुरंधर २' सिनेमाने चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमाचं आणि त्यातील पात्रांचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'धुरंधर २'मध्ये पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या आणि तिथल्या गुप्त कारवायांची माहिती भारताला देणाऱ्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची कहाणी दाखवली आहे. अनेक सेलिब्रिटीही 'धुरंधर २'चं कौतुक करत आहेत. मराठी गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी 'धुरंधर २' पाहून थक्क झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

सलील कुलकर्णी व्हिडीओमध्ये म्हणतात, "मित्रांनो 'धुरंधर २' बघायला तर मजा आलीच. पण ऐकायलाही मजा आली. बॅकग्राऊंड म्युझिक अत्यंत वेगळं आहे. त्या काळातली ९०च्या दशकातील गाणी येतात. साधारणपणे इंटेन्स सीनला स्ट्रिंग्स किंवा हॉर्न वाजतात तसं काहीच नाहीये. एक वेगळंच गाणं वाजतं. कदाचित त्या कालावधीतील गाणं असेल. सिनेमाची गोष्ट मी सांगणार नाही कारण स्पॉयलर कोणालाच द्यायचा नाहीये. पण मला असं वाटतं की दुष्ट शक्तींविषयचा त्यांच्या विरुद्ध बोलणारा हा सिनेमा आहे. कुठल्याही देशाने कोणत्याही देशाविरुद्ध किंवा देशाअंतर्गत लष्करी कारवाया करणाऱ्याबाबत बोलणारा हा सिनेमा आहे". 


'धुरंधर २' पुन्हा बघायचाय! 

"मला तर खूप मजा आली. खूप ठिकाणी मला भरुन आलं. काही ठिकाणी असं वाटलं की या दहशतवाद्यांना असंच पाहिजे. 'धुरंधर २' नक्की बघा. भारतीयांनी एकत्र येऊन असा काहीतरी सिनेमा बघायला मजा येते. खरं सांगू का इंडियाची मॅच बघताना जी मजा येते तशीच मजा मला 'धुरंधर २' बघताना आली. कारण भारतीय म्हणून ती मजा असते. खूप स्ट्रगल करून आदित्य धर इथपर्यंत आला आहे. त्याला सॅल्यूट तर केलंच पाहिजे. मी 'धुरंधर २' एकदा बघितलाय. पण परत एकदा बघावा असं वाटतंय. काही देशांमध्ये सिनेमा बॅन आहे. तरीदेखील सिनेमाने कितीशे कोटी वगैरे कमावले आहेत. भारताच्या बाजूने बोलणारा हा सिनेमा आहे. भारताच्या विरुद्ध जे काम करतील त्यांच्या विरुद्ध बोलणारा हा सिनेमा आहे, जय हिंद", असं त्यांनी म्हटलं आहे. 

Web Title : सलील कुलकर्णी ने 'धुरंधर 2' की प्रशंसा की, आदित्य धर को सलाम किया।

Web Summary : सलील कुलकर्णी ने 'धुरंधर 2' की सराहना की, इसके अनूठे संगीत और भारत विरोधी गतिविधियों के खिलाफ संदेश को उजागर किया। उन्होंने आदित्य धर के प्रयासों की सराहना की, फिल्म को फिर से देखने की इच्छा व्यक्त की, और इसके भारत समर्थक रुख की सराहना की।

Web Title : Saleel Kulkarni lauds 'Dhurandhar 2', salutes Aditya Dhar's vision.

Web Summary : Salil Kulkarni praised 'Dhurandhar 2', highlighting its unique music and message against anti-India activities. He lauded Aditya Dhar's efforts, expressing a desire to watch the movie again, appreciating its pro-India stance and patriotic feel.