पोस्टर बॉयज या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील विनोदी प्रसंग अन ...
पोस्टर बॉयज मध्ये देओल ब्रदर्स
/> पोस्टर बॉयज या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील विनोदी प्रसंग अन सामाजिक मेसेज या दोन्हींची सांगड लोकांच्या पसंतीस उतरली होती. आता मराठीतील या सुपर यशानंतर पोस्टर बॉयज हा सिनेमा हिंदीमध्ये येत आहे. आपला मराठमोळा हिरो श्रेयस तळपदे नुसताच पोस्टर बॉयज हिंदीत करीत नाहीये तर तो या चित्रपटातून अॅज अ डिरेक्टर म्हणुन पदार्पण देखील करीत आहे. श्रेयसच्या खांद्यावर आता दुहेरी बंदुक असणार आहे असे म्हणायला खरतर काहीच हरकत नाही कारण श्रेयस या चित्रपटामध्ये अॅक्टींग देखील करणार आहे. पोस्टर बॉयजचा हिंदीमध्ये रिमेक करताना नक्कीच प्रमुळ भुमिकेसाठी तगड्या कणखर नायकाची आवशकता होती अन आपल्या बॉलीवुडमध्ये ही व्यक्तीरेखी सनी पाजी शिवाय कोण साकारणार. तर श्रेयसने सनी देओलला या भुमिकेविषयी विचारले असता त्याने लगेचच होकार दिला अन दुग्धशर्करा योग म्हणजे दुसºया भुमिकेसाठी ज्युनिअर देओल अर्थात बॉबी ची वर्णी लागली. यमला पगला दिवाना या चित्रपटात आपण या दोन भावांना एकत्र धमाल करताना पाहिलेच होते आता पुन्हा एकदा श्रेयसच्या दिग्दर्शनाखाली हे दोघे काय कमाल करतात ते आपल्याला लवकरच पहायला मिळेल.