​ संघर्षयात्रामध्ये दिप्ती भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:19 IST2016-02-18T08:19:15+5:302016-02-18T01:19:15+5:30

           संघर्षयात्रा हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच जोरदार चर्चेत आहे.  या चित्रपटात पंकजा मुंडेंची भुमिका श्रृती मराठे ...

Deepti Bhagwat in the struggle yatra | ​ संघर्षयात्रामध्ये दिप्ती भागवत

​ संघर्षयात्रामध्ये दिप्ती भागवत

 

       संघर्षयात्रा हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच जोरदार चर्चेत आहे.  या चित्रपटात पंकजा मुंडेंची भुमिका श्रृती मराठे साकारणार असल्याचे तर सर्वांनाच माहित आहे. परंतू प्रज्ञा मुंडे यांच्या भुमिकेत आपल्याला अभिनेत्री दिप्ती भागवत पहायला मिळेल. दिप्ती उत्कृष्ठ गायिका आहे, तिने मराठी सारेरमप मध्ये सेलिब्रिटी सिंगर म्हणुन पार्टिसिपेटही केले होते. तसेच दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट देखील दिप्तीने केला आहे.
       संघर्षयात्रातील प्रज्ञा मुंडेंची भुमिका करताना दिप्ती खुप एक्सायटेड होती. मला फक्त गोपीनाथ मुंडेंच्या पत्नीचा रोल करायचा नव्हता तर प्रमोद महाजन यांच्या बहिणीची भुमिका देखील साकारायची होती. गोपीनाथ मुंडेंना आपण एक राजकिय नेता म्हणुनच ओळखायचो, परंतू मी प्रज्ञा मुंडेंची भुमिका करीत असताना गोपीनाथजींना जवळून ओळखले. कुटूंबासाठी असणारे त्यांचे प्रेम आणि काळजी दिसुन येते. एवढी आव्हानात्मक भुमिका माझ्या वाट्याला आल्याने मी खुप आनंदी आहे. गोपीनाथ मुंडेंच्या पत्नीची भुमिका मला करायला मिळाल्याने मी माझे भाग्य समजते. अशा भावना दिप्तीने व्यक्त केल्या.

Web Title: Deepti Bhagwat in the struggle yatra