सह्याद्रीची लेक..!, प्राजक्ता माळीची ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 19:17 IST2022-02-15T19:15:33+5:302022-02-15T19:17:54+5:30
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

सह्याद्रीची लेक..!, प्राजक्ता माळीची ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली पूर्ण
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ घातली आहे. तसेच ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तसेच बऱ्याचदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. दरम्यान प्राजक्ता माळीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळी हिने मराठमोळ्या साजमधील फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, सह्याद्रीची लेक. पारंपारिक मराठमोळा साजशृंगार करणं मला किती आवडतं, तुम्हाला काय सांगू.. तो मराठी थाट मोठ्या पडद्यावर दाखवता यावा, आपण एखादा ऐतिहासिक चित्रपट करावा अशी खूप दिवसांची इच्छा होती. “पावनखिंड” च्या निमित्ताने ती पूर्ण झाली. श्रीमंत भवानीबाई बांदल ह्यांची व्यक्तीरेखा साकारण्याच्या निमित्ताने दिग्पाल दादाने आयोजिलेल्या “श्री शिवराजअष्टक”चा भाग होता आलं; याचाही आत्यंतिक आनंद.
प्राजक्ता पुढे म्हणाली की, माझ्याप्रमाणे ज्यांना ज्यांना पारंपरिक मराठी साज करायला आवडतो, त्यांनी तुमचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि मला टॅग करा. सगळे फोटो १८ तारखेला माझ्या स्टोरीवर झळकतील. सह्याद्रीच्या लेकी. ऊर फाटे स्तोवरअभिमान.
आगामी प्रोजेक्ट्स
प्राजक्ता माळी ऐतिहासिक चित्रपट पावनखिंडमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट १८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तसेच ती लकडाउन या चित्रपटातही दिसणार आहे. यात तिच्यासोबत अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.