‘फोटोकॉपी’ ची तारीख अखेर कळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 13:10 IST2016-05-27T07:40:26+5:302016-05-27T13:10:26+5:30
वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाची तारीख अखेर जाहिर करण्यात आली. १६ सप्टेंबर ...

‘फोटोकॉपी’ ची तारीख अखेर कळली
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाची तारीख अखेर जाहिर करण्यात आली. १६ सप्टेंबर २०१६ रोजी ‘फोटोकॉपी’ प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला या चित्रपटातील कलाकार कोण हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे होते आणि आता याची तारीख कधी कळतेय असं प्रेक्षकांना झाले होते. पण आता तारीख कळली आहे, तर १६ सप्टेंबरला तयार राहूयात फोटोकॉपी साठी.
विजय मौर्या दिग्दर्शित ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाची कथा दोन जुळ्या बहिणींची आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पर्ण पेठे जुळ्या बहिणींची भूमिका साकारत आहे. पर्ण सोबत चेतन चिटणीस हा नवीन डॅशिंग चेहरा या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेतून दिसणार आहे.‘फोटोकॉपी’ हे नावंच फार इंटरेस्टिंग आहे ना... चला मग १६ सप्टेंबरची वाट पाहूयात.