डॅशिंग सोनालीची रफ्तार बाईकरायडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 16:28 IST2017-01-05T16:28:46+5:302017-01-05T16:28:46+5:30
मुलींनी बाईकच्या मागे बसून लाँग ड्राईव्हला जाण्याचा जमाना आता कुठच्या कुठे गेला. सध्याच्या मुली एकदम बिनधास्त अंदाजात फक्त बाईक ...

डॅशिंग सोनालीची रफ्तार बाईकरायडिंग
म लींनी बाईकच्या मागे बसून लाँग ड्राईव्हला जाण्याचा जमाना आता कुठच्या कुठे गेला. सध्याच्या मुली एकदम बिनधास्त अंदाजात फक्त बाईक चालवतानाच नाही तर रायडिंग करताना देखील पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना, आपली मराठीमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील बाईकवेडी असल्याचे नुकतेच समजले आहे. सोनालीला बºयाचवर्षांपासून बाईर रायडिंगची आवड असल्याचे कळतेय. अहो असे आम्ही सांगत नाही, तर याचा उलगडा खुद्द डॅशिंग सोनालीनेच केला आहे. लोकमत सीएनएक्सशी बोलताना सोनाली सांगते, मला पुर्वीपासूनच बाईकचे फार आकर्षण आहे. बाईक रायडिंग करायला मला फारच आवडते. बाईकची क्रेझ खरंतर मला माझ्या भावांमुळे निर्माण झाली. संदिप आणि संदेश या माझ्या दोन्ही भावांकडे त्यावेळी बाईक्स होत्या. मग मी त्या दोघांनाही विनंती करुन बाईक चालवायला मागायचे. तर कधी त्यांच्या बाईक पळवूनही मी रायडिंगला गेली आहे. मी पुण्याची असल्याने बºयाचदा टु व्हीलर चालवते. बाईकवर मी खुप ठिकाणी फिरली आहे. बाईकवर फिरायला जाण्याची किंवा रायडिंग करण्याची मजाच काही और असते. मी अजुनतरी पुणे-मुंबई हा प्रवास बाईकवर केलेला नाही. पण नक्कीच ही इच्छा देखील मी लवकरच पुर्ण करीन,असे सोनालीने सांगितले आहे. एवढेच नाही तर सोनालीला एमएस धोनी खुप आवडतो कारण त्याच्याकडे सर्वात जास्त बाईकचे कलेक्शन आहे. चित्रपटांमध्ये आपण अनेक हिरोईन्सना बाईक चालवताना किंवा बाईकवर अॅक्शनसीन्स करताना पाहतो. परंतू त्या गोष्टी केवळ सिनेमांसाठी इफेक्ट्स देऊन केलेल्या असतात. पण ही बिनधास्त सोनाली रिल लाईफ नाही तर रिअल लाईफमध्ये देखील जबरदस्त बाईकर असल्याचे आता सर्वांनाच समजले आहे. त्यामुळे जर एखादया चित्रपटात तुम्हाला सोनाली बाईक रायडिंग करताना दिसली तर जास्त आश्चर्य वाटून घेऊ नका.