Dashavatar: कमाई घटली तरी वीकेंडला कोटींमध्ये कमाई! 'दशावतार' सिनेमाचं आत्तापर्यंतचं कलेक्शन किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:52 IST2025-09-29T15:52:13+5:302025-09-29T15:52:31+5:30
Dashavatar Box Office Collection: 'दशावतार' सिनेमाचे शो पहिल्या दिवसापासूनच हाऊसफूल होत आहेत. मात्र आता सिनेमाची कमाई घटत आहे. असं असूनसुद्धा वीकेंडला 'दशावतार'ने कोटींमध्ये कमाई केली आहे.

Dashavatar: कमाई घटली तरी वीकेंडला कोटींमध्ये कमाई! 'दशावतार' सिनेमाचं आत्तापर्यंतचं कलेक्शन किती?
Dashavatar Box Office Collection: 'दशावतार' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अतिशय गंभीर आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर या सिनेमातून भाष्य केलं गेलं आहे. या सिनेमातून दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शन घडवून आणलं. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षका सिनेमागृहात गर्दी करत आहे.
'दशावतार' सिनेमाचे शो पहिल्या दिवसापासूनच हाऊसफूल होत आहेत. मात्र आता सिनेमाची कमाई घटत आहे. असं असूनसुद्धा वीकेंडला 'दशावतार'ने कोटींमध्ये कमाई केली आहे. शनिवारी 'दशावतार' सिनेमाने १ कोटींचा गल्ला जमवला. तर रविवारी ८५ लाख रुपये कमावले आहेत. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २० कोटींचा गल्ला जमवला आहे.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, विनोद तावडे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.