रिंकू राजगुरुच्या 'कागर' सिनेमातील 'दरवळ मव्हाचा' हे भन्नाट गाणं तुम्ही ऐकलंत का ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 14:41 IST2019-04-24T14:35:54+5:302019-04-24T14:41:22+5:30

ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे

Darval Mavhacha' song release of Kaagar movie | रिंकू राजगुरुच्या 'कागर' सिनेमातील 'दरवळ मव्हाचा' हे भन्नाट गाणं तुम्ही ऐकलंत का ? 

रिंकू राजगुरुच्या 'कागर' सिनेमातील 'दरवळ मव्हाचा' हे भन्नाट गाणं तुम्ही ऐकलंत का ? 

कागर चित्रपटातील युवराज आणि राणीची संपूर्ण महाराष्ट्रात बरीच चर्चा रंगत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तावडे या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे.

चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच आहे पण या चित्रपटामधील संगीताला देखील प्रेक्षकांची दाद मिळत आहे... नुकतेच कागर चित्रपटातील “दरवळ मव्हाचा” हे गाण प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे ज्यामध्ये युवराज आणि राणीचे हळूवार फुलत जाणारे प्रेम बघायला मिळत आहे ... रिंकू या गाण्यामधील दोन्ही लुक्समध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.

याआधी लागलीया गोडी तुझी आणि नागिन डान्स या गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटामधील गाण्यांबरोबरच संवाद देखील तितकेच लोकांना आवडत आहेत.

वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज - उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Darval Mavhacha' song release of Kaagar movie