'डॅडी'मकरंद देशपांडे २० वर्षीय तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये,लवकरच करणार लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 17:35 IST2017-12-01T11:32:42+5:302017-12-01T17:35:16+5:30
आपल्या अभिनयाने मराठी सिनेमासह रंगभूमी, हिंदी सिनेमांमध्ये छाप पाडणारे अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे.मात्र मकरंद देशपांडे यांचं खासगी आयुष्यसुद्धा तितकंच ...

'डॅडी'मकरंद देशपांडे २० वर्षीय तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये,लवकरच करणार लग्न!
आ ल्या अभिनयाने मराठी सिनेमासह रंगभूमी, हिंदी सिनेमांमध्ये छाप पाडणारे अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे.मात्र मकरंद देशपांडे यांचं खासगी आयुष्यसुद्धा तितकंच चर्चेत राहिलं आहे.शशी कपूर यांची कन्या संजना कपूर यांच्यासह मकरंद यांच्या अफेअर आणि रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.आता वयाची पन्नाशी ओलांडलेले मकरंद देशपांडे पुन्हा एकदा नव्या अफेअर आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत.मकरंद यांच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्षांनी लहान असणा-या तरुणीचं आगमन झालं आहे.तिचं नाव आहे निवेदिता पोहनकर. ती लेखिका असून पृथ्वी थिएटरशी जोडली गेलेली आहे.रंगभूमीवर वावरतानाच या दोघात प्रेमाचे नातं निर्माण झाल्याचे सांगण्यात येतं. गेल्या ७-८ वर्षांपासून दोघं एकत्र आहेत.मकरंद आणि निवेदिता ब-याचदा एकत्र पाहायला मिळतात.नुकताच निवेदिताने दोघांचा एकत्र असलेला सेल्फी शेअर केला होता.'घरात चुकीला माफी नाही' असं कॅप्शन निवेदिताने या फोटोला दिल्याने दोघं लिव इन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्यात होत्या.तसेच खुद्द मकरंद यांनीच पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे जाहिरपणे सांगितले आहे.निवेदिता मराठी अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहिण आहे. तिची आई शोभा पोहनकर नॅशनल लेव्हल हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन आहेत.याशिवाय तिचे काका अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत.
काही दिवसांपासून मॉडेल आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण याची त्याच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबतची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली असून,सोशल मीडियावर त्यांची लव्हस्टोरी नव्याने रंगविली जात आहे. मुंबई येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये हे दोघे एकत्र आले होते. याबाबतचा त्याने एक फोटोही त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केला. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद आणि अंकिता या इव्हेंटमध्ये हातात हात घालून आले होते. मिलिंदने रॅम्पवरही आपला जलवा दाखविला. मीडिया रिपोर्ट्सनुसार ५१ वर्षीय मिलिंदच्या गर्लफ्रेंड अंकिताचे वय १८ वर्ष आहे.