/> आपल्या सर्वांमध्ये एक हिरो राहतो फक्त आपल्याला त्याला शोधता आले पाहिजे या संकल्पनेवर आधारीत सांगतो ऐका या चित्रपटाची निवड प्रतिष्ठीत दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये झाली. महाराष्ट्रातील एका छोट्याशा कांबळवाडी या गावामध्ये घडुन आलेली ही कथा आहे एका दारुड्या स्टॅन्डअप कॉमेडियन आंबटराव घोलप (सचिन पिळगावकर) यांची. पत्नी आणि मुलगा यांना जेव्हा त्यांची लाज वाटु लागते तेव्हा मात्र हा दारुडा आपली समयसुचकता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांच्या नजरेत हिरो बनतो. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर, संस्कृती बालगुडे,पुजा सावंत, मिलिंद शिंदे,जगन्नाथ निवंगुणे,भाऊकदम,वैभव मांगले,विजय चव्हाण यांच्या भुमिका आहेत. सतीश राजवाडे याबद्दल सांगतात की, या चित्रपटाची दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये अधिकृत निवड होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तर याआधी कधीही न झालेली ही वेगळी भुमिका मला करायला अतिशय आवडली असे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.