सायकल चित्रपटाचे पोस्टर झाले प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:33 IST2017-03-03T10:03:07+5:302017-03-03T15:33:07+5:30
कॉफी आणि बरंच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले होते. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची ...

सायकल चित्रपटाचे पोस्टर झाले प्रदर्शित
क फी आणि बरंच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले होते. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली होती. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. & जरा हटके या चित्रपटाद्वारे त्यांनी एक मॅच्युर्ड लव्हस्टोरी मांडली होती. या दोन चित्रपटांच्या यशामुळे प्रकाश कुंटे यांच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
प्रकाश कुंटे आता सायकल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये आपल्याला भाऊ कदम, हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत आहेत. हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असणार आहे हे पोस्टरवरूनच कळत आहे. या पोस्टरमध्ये प्रियदर्शन आणि भाऊ दोघेही साधूंच्या कपड्यात दिसत आहेत. हे दोघे भोंदू बाबाची व्यक्तिरेखा साकारत आहेत का हा प्रश्न हा पोस्टर पाहून नक्कीच पडतोय. या पोस्टरमध्ये प्रियदर्शन, हृषिकेश, भाऊ हे तिथेही सायकलवर बसलेले दिसत आहेत. प्रियदर्शनने भाऊला डबल सीट घेतले आहे तर हृषिकेश विरुद्ध दिशेने बसलेला आहे. हृषिकेश सदरा आणि कोटात दिसत असून या दोघांकडे पाहून त्याला भलामोठा प्रश्न पडला आहे असे या पोस्टमधून स्पष्ट दिसत आहे.
प्रकाश कुंटे यांनी आतापर्यंत कधीच कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेला कॉफी आणि बरंच काही आणि & जरा हटके या दोन्ही चित्रपटांचा जॉनर वेगळा होता. आता हा त्यांचा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.