कुरळ्या केसाच्या श्रृती मराठेचा अंदाज तुम्हाला करेल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 14:29 IST2019-02-02T14:25:43+5:302019-02-02T14:29:46+5:30
श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

कुरळ्या केसाच्या श्रृती मराठेचा अंदाज तुम्हाला करेल घायाळ
छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री श्रृती मराठेने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.
या फोटोमध्ये श्रृतीची बदललेली हेअरस्टाईल तुम्हाला आकर्षित करेल. कुरळ्या केसाची तिची नवी स्टाईल साऱ्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे. कुरळ्या केसासह तिच्या चेहऱ्यावरील हास्य घायाळ करणारं असंच म्हणावं लागेल. तिच्या या फोटोवर फॅन्स आणि नेटिझन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.
श्रृतीची विविध रुपं रसिकांनी पाहिली आहेत. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. वेगवेगळ्या अंदाजातील श्रृतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. आता श्रृतीचा एक फोटो समोर आला आहे. तिचा हा फोटो बालपणीचा आहे. बालपणीचे फोटो आणि आठवणी कुणासाठीही खास असतात. तसाच श्रृतीने शेअर केलेला हा फोटो तिच्यासाठी थोडा खास आहे. या फोटोमध्ये श्रृती आणि तिचा भाऊ पाहायला मिळत आहे.
बालपणीचा श्रृतीचा अंदाज कुणालाही मोहून टाकेल असाच आहे. भावाबहिणींचं नातं हे अनोखं असतं. रुसवेफुगवे, भांडणं आणि खूप सारं प्रेम म्हणजे भावाबहिणीचं नातं. असंच प्रेम श्रृती आणि तिच्या भावामध्येही आहे. हेच प्रेम या फोटोतही पाहायला मिळत आहे. याशिवाय श्रृतीचा खास अंदाजही तितकाच लक्षवेधी आहे. बालपणी श्रृतीची बॉयकट हेअरस्टाईल होती. बॉयकट अंदाजातील श्रृतीचा अंदाज क्यूट असाच असल्याचं पाहायला मिळतंय. श्रृतीचा पूर्ण लूक स्पोर्टी असल्याचंही यांत दिसत आहे. एकूणच आपल्या अंदांनी विविध सिनेमात रसिकांची मनं जिंकणा-या श्रृतीचा बालपणीचा हा निरागस अंदाज नक्कीच आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.