कसलेल्या कलाकारांसह झळकणार संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 16:44 IST2016-05-17T11:02:10+5:302016-05-17T16:44:41+5:30
दिलखेचक नृत्याच्या अदांनी तमाम प्रेक्षकांना घायाळ करणारी संस्कृती बालगुडे आता एका नव्या चित्रपटात अनेक ...

कसलेल्या कलाकारांसह झळकणार संस्कृती
आता चित्रपटाची शुटिंग कधी सुरु होतेय अ्न मी कधी काम करतेय अस झालय. सध्या तरी मी या चित्रपटाचे नाव सांगु शकत नाही पण ते तुम्हाला लवकरच समजेल. यामध्ये तुम्हाला एकदम मॅड कॉमेडी पहायला मिळणार हे मात्र नक्की. हा काही टिपिकल हिरो - हिरोईनचा चित्रपट नाही तर सगळ््यांची धमाल कॉमेडि आहे. एवढेच नाही तर सिनेमाचा मुहूर्त झाल््यानंतर या सगळ््या कलाकारांना सेल्फी सेशन करायचे होते. परंतू यामध्ये दिलीप प्रभावळकर यांना बोलवायची भीती वाटत असल्याचे संस्कृतीने सांगितले. पण जेव्हा हिने तिचा फोन सेल्फी काढण्यासाठी आॅन केला तेव्हा दिलीप सरांनी मागुन थम्पअपची पोझ दिल्याचे संस्कृती सांगते. आता हा चित्रपट सुरु होण्याआधीच जर एवढी धमाल होत असेल तर नक्कीच तो पाहण्यासाठी प्रेक्षक उताविळ होतील यात मात्र शंका नाही.